राज्याच्या पोलीस महासंचालक पदी कोण? यूपीएससी समितीची दिल्लीत बैठक

राज्याच्या पोलीस महासंचालक पदी कोण? यूपीएससी समितीची दिल्लीत बैठक

राज्याच्या पोलीस महासंचालक पदी कोण? यूपीएससी समितीची दिल्लीत बैठक

दिल्लीमध्ये आज राज्यातील पोलीस महासंचालक नियुक्ती संदर्भात यूपीएससी समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थितीत राहणार आहेत. या बैठकीमध्ये राज्य सरकारकडून पोलीस महासंचालक पदासाठी देण्यात आलेल्या नावांवर चर्चा करून तीन नावं राज्य सरकारला देण्यात येणार आहे. त्यानंतर यूपीएससीकडून देण्यात आलेल्या तीन नावातून एका नावाची पोलीस महासंचालक पदासाठी राज्य सरकारकडून नियुक्ती करण्यात येईल.

सध्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार संजय पांडे यांच्याकडे आहे. राज्य सरकारकडून पोलीस महासंचालक पदासाठी एकूण २० नावं यूपीएससीला देण्यात आली आहेत. या २० नावांपैकी तिघांची नावं यूपीएससी समिती राज्य सरकारला सूचवणार आहेत. त्यानंतर राज्य सरकार एका नावावर शिक्कामोर्तब करणार आहे.

या यूपीएससी समितीच्या बैठकीत यूपीएससी बोर्डाचा एक सदस्य, केंद्रीय गृहमंत्रालयाचा वरिष्ठ अधिकारी, पोलीस दलातील प्रमुख अधिकारी यांच्यासह महाराष्ट्र सरकारकडून राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थितीत असणार आहे. यासाठी सीताराम कुंटे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.

राज्य सरकारच्या पोलीस महासंचालक पदासाठी संजय पांडे, रजनीश शेख, हेमंत नगराळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत यूपीएससीचे पॅनल तीन नावं राज्य सरकारला देईल. मग त्यानंतर राज्य सरकार निर्णय काय घेते? पोलीस महासंचालक पदी कुणाची वर्णी लागतेय? हे येत्या काळात समजेल.


हेही वाचा – ‘भाजपचे लोकं ईडीच्या कार्यालयात की ईडीचे अधिकारी भाजप कार्यालयात?’


First Published on: August 31, 2021 1:20 PM
Exit mobile version