घरताज्या घडामोडी'भाजपचे लोकं ईडीच्या कार्यालयात की ईडीचे अधिकारी भाजप कार्यालयात?'

‘भाजपचे लोकं ईडीच्या कार्यालयात की ईडीचे अधिकारी भाजप कार्यालयात?’

Subscribe

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काल, सोमवारी ट्वीट करून ठाकरे सरकारमधील महान इलेव्हन यादी जाहीर केली होती. ईडीची कारवाई ठाकरे सरकारमधील कोणत्या नेत्यांवर होणार याची माहिती दिली होती. यामध्ये ठाकरे सरकारमधील ११ मंत्र्यांची नाव होती. याच अनुषंगाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘ईडीचे कामकाज नेमकं कोण चालवतंय? भाजपचे लोकं ईडीच्या कार्यालयात बसले आहेत की ईडीचे अधिकारी भाजप कार्यालयात बसले आहेत? खरोखर ईडीचं समन्स पाठवते का?,’ असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थितीत केले आहेत.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, ‘याला राजकीय रंग आहेत. राजकीय दबाव आहे. भाजपचे लोकं सोशल मीडियावरती शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांमधील कोणत्या नेत्यांना आता ईडी बोलावणार याची यादी जाहीर करतात. म्हणजेच भाजपचा समन्स आहे का ईडीचा समन्स? हा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच भाजपचे लोकं ईडीच्या कार्यालयात बसले आहेत की ईडीचे अधिकारी भाजपच्या कार्यालयात बसले आहेत. याचा शोध घेण्याची गरज आहे. अनिल परब यांना ईडीची नक्की नोटीस आलेली आहे. पण आज ते कार्यालयात गेलेले नाहीत आणि आज ते जाणार नाहीत.’

- Advertisement -

पुढे राऊत म्हणाले की, ‘देशात असं पहिल्यांदाच घडत आहे की, ईडी, सीबीआय काय करणार आहे, कोणाला समन्स पाठवणार आहे, हे भाजपच्या नेत्यांना माहिती आहे आणि ते सोशल मीडियावर यादी टाकत आहेत. त्यामुळे ईडी भाजप चालवत आहे किंवा भाजपला ईडी चालवत आहे. आम्हाला फक्त संरक्षण खात्याचं रडार माहित आहे. त्या रडावर शत्रूची माहिती गोळा केली जाते. त्यानुसार देशाच्या शत्रूवर हल्ले केले जातात. जर ईडी, भाजपच्या रडारवर आम्ही असू, तर ते आम्हाला देशाचे दुश्मन मानत आहेत. तसं असेल तर लावा रडार आमच्यावर.’


हेही वाचा – मंदिरे उघडली पाहिजेत, अन्यथा मंदिराबाहेरच घंटानाद करणार – राज ठाकरे

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -