पाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानांवर अमेरिकेने घातली बंदी!

पाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानांवर अमेरिकेने घातली बंदी!

पाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानांवर अमेरिकेने घातली बंदी!

अमेरिकेच्या परिवहन विभागाने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) च्या अमेरिकेत चार्टर उड्डाणे चालविण्याची परवानगी रद्द केली असल्याचे सांगितले आहे. फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) च्या पाकिस्तानी वैमानिकांच्या सर्टिफिकेशन (पात्रता) बद्दल असलेली चिंता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, विभागाच्या विशेष प्राधिकरणाने त्यांना शुक्रवारी ही माहिती दिली. गेल्या महिन्यात झालेल्या तपासणीत पाकिस्तानला आढळले आहे की, साधारण एक तृतीयांश वैमानिकांनी त्यांच्या पात्रतेमध्ये हेर-फेर केले आहेत.

युरोपियन युनियननेही घातली बंदी

युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या कॅरियर ऑपरेशन्स सहा महिन्यांपूर्वीच रद्द केले आहे. मात्र पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने अमेरिकेच्या उड्डाणाला रद्द करण्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

वैमानिकांच्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह…

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांची पुष्टी केली असल्याचे पाकिस्तानच्या जिओ न्यूजने वृत्त दिले आहे. पीआयने सांगितले की, विमान कंपन्यामधील सुरू असलेल्या सुधारात्मक उपायांच्या माध्यमातून या चिंता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे मे महिन्यात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान विमानतळावर उतरताना दुर्घटनाग्रस्त झाले होते. या घटनेत ९७ जण ठार झाले होते. तेव्हापासून वैमानिकांच्या पात्रतेबाबत (सर्टिफिकेशन) प्रश्न उपस्थितीत होऊ लागले आहेत.


Online ऑर्डर केलं सोनं! उघडून पाहिलं आणि निघालं…
First Published on: July 10, 2020 11:43 AM
Exit mobile version