बायडेन राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित झाले तेव्हा ट्रम्प काय करत होते? Video Viral

बायडेन राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित झाले तेव्हा ट्रम्प काय करत होते? Video Viral

संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव मान्य केल्याचे दिसत नाही आहे. निकाल लागला तेव्हा ट्रम्प काय करत होते असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल दोन दिवसांनी लागला. या दोन दिवसात जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचा दावा केला होता. ट्रम्प यांनी बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्षावर आरोप केले होते. दरम्यान, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून जो बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प व्हर्जिनियामध्ये गोल्फ खेळत होते.

संपूर्ण देश शनिवारी जो बायडन यांना शुभेच्छा देत असताना ट्रम्प गोल्फ खेळण्यात व्यस्त होते. त्यांचे गोल्फ खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले असून चर्चेचा विषय बनले आहेत.

बायडेन यांना फोन करताच कमला हॅरिस यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल लागताच कमला हॅरिस यांनी जो बायडेन यांना फोन करत आपण जिंकलो असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. या क्षणाचा व्हिडीओ कमला हॅरिस यांनी शेअर केला आहे. कमला हॅरिस यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कमला हॅरिस यांनी “We did it Joe! तुम्ही अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष होणार आहात” असे जो बायडन यांना म्हटले आहे.

 

First Published on: November 8, 2020 12:30 PM
Exit mobile version