२६/११ सूत्रधारांना पकडून देणाऱ्यांना अमेरिका देणार ३५ कोटी

२६/११ सूत्रधारांना पकडून देणाऱ्यांना अमेरिका देणार ३५ कोटी

अमेरिकेचे राज्य सचिव माइक पोम्पो

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज दहा वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात भारतीयांबरोबरच विदेशी नागरिकांचा ही बळी गेला होता. २६/११ च्या दहशतवादी हल्लयाच्या दोषींना पकडून देणाऱ्यांना अमेरिकेने बक्षीस जाहीर केले आहे. हे बक्षीस पाकिस्तानला जाहीर करण्यात आले आहे. अमेरिकेचे राज्य सचिव माइक पोम्पो यांनी ५ दशलक्ष डॉलर्स (३५ कोटी) रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. २००८ मध्ये झेलेल्या या हल्लयाची योजना आखणारा पाकिस्तानमध्ये असल्याचे ही यावेळी पोम्पो यांनी सांगितले आहे. मागील काही काळापासून पाकिस्तान आणि अमेरिकेतील संबध बिघडत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी मदत थांबवण्याचा निर्णय घेतला होता.

काय म्हणाले पोम्पो

अमेरिकेचे राज्य सचिव माइक पोम्पो यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली दिली. “मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या १० व्या वर्षी मी शहीद झालेल्या भारतीय आणि अमेरिकन नागरिकांना अमेरिकन सरकाच्या वतीने श्रद्धांजली देतो. या हल्ल्यात भारतीय आणि सहा अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता त्यांचे कुंटुंब आणि मित्रांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. २६/११ ची क्रूरता सर्व जगाने आपल्या डोळ्यांनी पाहिली. आज दहा वर्षानंतर ही या हल्ल्याचे आयोजन करणारा अजून पकडल्या गेला नाही. आम्ही सर्व देशांना आवाहन केले आहे पाकिस्तानला विशेष की या हल्ल्यातील दोषींना पकडण्यास मदत करावी. त्यांना पकडणेच या शहीदांना न्याय दिल्या सारखे असेल” – राज्य सचिव माइक पोम्पो

First Published on: November 26, 2018 10:34 AM
Exit mobile version