CoronaVirus Effect: महिन्यातभरात एक अब्ज डॉलर्सने ट्रम्प यांच्या संपत्तीत घट!

CoronaVirus Effect: महिन्यातभरात एक अब्ज डॉलर्सने ट्रम्प यांच्या संपत्तीत घट!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

जगभरातील कोरोनाचे संकट रोखण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे यादरम्यान अनेक जगातील श्रीमंत लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत गेल्या एक महिन्यात एक अब्ज डॉलर्सने घट झाली आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या २०२० च्या यादीनुसार २.१ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले जगातील १००१ क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा एक मोठा रिअल इस्टेट व्यवसाय आहे. त्याच्या हा व्यवसाय अमेरिकेपासून भारतात पर्यंत पसरला आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, १ मार्च ते १० मार्च २०२० या काळात ट्रम्प यांच्या बोस्टन प्रॉपर्टीज आणि व्होर्नाडो रिअॅलिटी ट्रस्टच्या कंपन्याचे शेअर्समध्ये सुमारे ३७ टक्क्यांनी घसरण झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

फोर्ब्सनुसार, ७३ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांची महिन्याभरापूर्वी संपत्ती ३.२ अब्ज डॉलर्स होती. जानेवारी २०१७ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. तेव्हा अमेरिकेच्या इतिहासातील पहिले अब्जाधीश ट्रम्प होते. न्यूयॉर्कमध्ये मॅनहॅटन भागात त्याच्या खूपसाऱ्या इमारती आहेत. याशिवाय त्यांच्याकडे बऱ्याच गोल्फ कोर्स आणि वाईनरी देखील आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात वडिलांच्या मित्रासोबत केली होती. त्यांनी ब्रुकलीन आणि क्विन्समध्ये खूप घरे बांधली होती. आता त्यांची दोन मुले डोनाल्ड जूनियर एरिकचा व्यवसाय पाहत आहेत. फोर्ब्सच्या यादीत पहिल्यांदा १९८२ मध्ये वडिलांसोबत ४०० व्या क्रमांकावर होते. त्यावेळेस त्यांची संपत्ती २० कोटी डॉलर होती.

भारतात पहिल्यांदा २०१३ साली ट्रम्प यांच्या कंपनीने प्रवेश केला. गेल्या ७ वर्षात भारतातील अनेक भागात ट्रम्प यांच्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ट्रम्प यांची कंपनी ट्रम्प ऑर्गनायझेशनने भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने ५ लक्झरी निवासी प्रकल्प सुरू केले आहेत. ट्रम्प यांनी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. देशात तुम्हाला मुंबई, पुणे, गुरुग्रामम आणि कलकत्ता येथील भागात ट्रम्प टॉवर पाहायला मिळतील.


हेही वाचा – CoronaVirus: कोरोनाचा सामुहिक संसर्ग भारतात होत नाही; WHOने चूक केली मान्य


 

First Published on: April 10, 2020 11:09 PM
Exit mobile version