ऐकावं ते नवलच! मुस्लिम भाडेकरूनं घरात लावला मोदींचा फोटो अन् घरमालकाला आला राग, मग…

ऐकावं ते नवलच! मुस्लिम भाडेकरूनं घरात लावला मोदींचा फोटो अन् घरमालकाला आला राग, मग…

pm narendra modi photo

इंदुरः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो घरात लावणं एका मुस्लिम तरुणाला भारी पडलंय. भाडेकरूनं मोदींचा घरात फोटो लावल्यानं घर मालकानं भाडेकरूला खोली रिकामी करण्याची धमकी दिलीय. तरुणानं आता सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारधारेनं प्रेरित एक तरुण मंगळवारी इंदुरमध्ये झालेल्या जनसुनावणीत पोहोचला. पीर गल्लीत राहणाऱ्या युसुफने सांगितलं की, त्याने आपल्या घरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावला आहे. तो हटवण्याच्या मागणीसाठी घर मालक शरीफ मन्सुरी, याकूब मन्सुरी आणि सुल्तान मन्सुरी दबाव आणत होते. तसेच असं न केल्यास घर रिकामी करण्याची धमकी देत आहेत.

पीएम मोदींच्या फोटोवरून वाद

पीडित तरुणाच्या माहितीनुसार, पीएम मोदींचा फोटो लावल्यानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न झाला. गेल्या 8 दिवसांत त्याच्या घराची अशी अवस्था झाली की, त्याच्या आईला हृदयविकाराचा झटका आला, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे घरमालक घर रिकामी करण्याची वारंवार धमकी देत आहे. त्याला कंटाळूनच जनसुनावणी लावण्यात आली.

कुशीनगरमध्येही झाली अशी घटना

एडिशनल डीसीपी मनीष पाठक सोनीनं सांगितलं की, हे प्रकरण तपासासाठी सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये सोपवण्यात आलं आहे. सध्या अशाच एका प्रकरणात यूपीतल्या कुशीनगरमध्ये भाजपच्या विजयावर तरुणाला हाणामारी करून त्याची हत्या करण्यात आली होती. भाजपच्या विजयावर त्यानं कुशीनगरमध्ये मिठाईचं वाटप केलं, त्याचा राग मनात धरत जमावानं त्याला संपवलं.


हेही वाचाः अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांची सुट्टी कायम

First Published on: March 30, 2022 8:08 AM
Exit mobile version