Uttarakhand Weather Update: पूर-पाऊस, भूस्खलनामुळे उत्तराखंडला मोठा फटका; आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू

Uttarakhand Weather Update: पूर-पाऊस, भूस्खलनामुळे उत्तराखंडला मोठा फटका; आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू

Uttarakhand Weather Update: पूर-पाऊस, भूस्खलनामुळे उत्तराखंडला मोठा फटका; आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू

मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि अचानक आलेल्या पूरामुळे उत्तराखंडमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे उत्तराखंडमध्ये आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या नैनीतालमध्ये २५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. उत्तराखंडमधील या परिस्थितीमुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी भूस्खलन आणि ढगफुटी झाल्यामुळे अचानक पूर आला आहे. यामधून बऱ्याच लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. माहितीनुसार, कुमाऊंमध्ये पाण्याची पातळी कमी होत असली तरी रस्ते खुले करण्यास अजून बराच वेळ लागणार आहे. मुसळधार पाऊस आणि पूरामुळे काही भागातील संपर्क तुटला आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकं अडकले आहेत. SDRF आणि NDRFसोबत पोलिसांचे पथक देखील लोकांची सुखरुप सुटका करण्यास मदत करत आहेत.

दरम्यान उत्तराखंडमध्ये बचावकार्यासाठी भारतीय हवाई दलाचे तीन हेलिकॉप्टर मदतीस धावून आले. यामधील दोन हेलिकॉप्टर्सना नैनीताल जिल्ह्यात तैनात करण्यात आले. नैनीतालमध्ये भूस्खलन आणि ढगीफुटी झाल्यामुळे परिस्थिती खूप भयानक झाली आहे. ज्या ठिकाणी भूस्खलन झाले आहे, तेथील रस्त्यावरील मलबा काढायचे काम सुरू आहे.

रामनगरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने ३६हून अधिक गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. पंतनगरमध्ये तीन ठिकाणी अडकलेल्या २५ लोकांच्या सुटकेसाठी हवाई दलाच्या ध्रुव हेलीकॉप्टरची मदत घ्यावी लागली. भूस्खलनामुळे नैनीतालला जाणाऱ्या रस्त्यावर मलबा आल्यामुळे पर्यटन स्थळाचे राज्यातील इतर भागाशी संपर्क तुटला आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी लोकांना घाबरू नये असे आवाहन करत म्हणाले की, ‘सर्वांना सुरक्षित बाहेर काढले जाईल. वातावरणात सुधारणा होईपर्यंत ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी थांबा.’

उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार म्हणाले की, ‘आतापर्यंत हजारो लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. गढवालमध्ये परिस्थिती सुधारली आहे. बंद रस्ते पुन्हा एकदा हळूहळू खुले केले जात आहेत. लवकरच चारधाम यात्रा सुरू होण्याची आशा आहे.’


हेही वाचा – PM Modi आज कुशीनगर इंटरनॅशनल एअरपोर्टचे करणार उद्घाटन


 

First Published on: October 20, 2021 10:44 AM
Exit mobile version