डायबिटीज असूनही व्यंकय्या नायडूंची कोरोनावर यशस्वी मात; सांगितले सिक्रेट

डायबिटीज असूनही व्यंकय्या नायडूंची कोरोनावर यशस्वी मात; सांगितले सिक्रेट

डायबिटीज असूनही व्यंकय्या नायडूंची कोरोनावर यशस्वी मात; सांगितले सिक्रेट

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना २९ सप्टेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. परंतु स्वदेशी जेवणापासून ते भरपूर डाइट आणि फिजिकल फिटनेसमुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये स्वतःला फिट आणि पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काय करत होते हे त्यांनी सांगितले आहे.

उपराष्ट्रपती यांनी सांगितले की, ‘फिजिकल फिटनेस, मेंटल एक्सरसाइज आणि डाइटमध्ये स्वदेश जेवण यामुळे या व्हायरससोबत लढाई जिंकू असा मला विश्वास होता. जरी माझे वय आणि डायबिटीजसारख्या मेडिकल समस्या असूनही मी फिजकल फिटनेस, योग आणि वॉकिंग सारख्या दररोजच्या एक्सरसाइज करून कोरोना व्हायरस दूर करू शकतो, असा माझा विश्वास होता. याव्यतिरिक्त मी फक्त स्वदेशी जेवण जवलो होतो. सेल्फ आयसोलेशनच्या काळात मी सर्व अशाप्रकारे करत होतो.’ कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर त्यांनी आपला अनुभव सांगितला. वॉकिंग, जॉगिंग आणि योगसारखे कोणत्याही फिजिकल एक्सरसाइज दररोज करण्याचे त्यांनी आवाहन केले.

त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘डाइटमध्ये प्रोट्रीनयुक्त पदार्थ खाणे आणि जंक फूड टाळणे महत्त्वाचे आहे. आपल्या सुरक्षिततेची मर्यादा कमकुवत होऊ देऊ नये त्यामुळे मास्क घाला, सतत हात धुवा, नेहमी साफ-सफाई करा. अशा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे देखील महत्त्वाचे आहे.’

होम क्वारंटाईनच्या दरम्यान त्यांनी दिनक्रमांबद्दल सांगितले की, ‘न्यूजपेपर, मॅगजीन आणि आर्टिकल वाचल्यामुळे त्यांचा दिवस चांगला जात होता. यादरम्यान त्यांनी स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित अनेक वेगवेगळ्या बाबींचा अभ्यासही केला.’ ते म्हणाले की, ‘दर आठवड्याला मी दोन फेसबुक पोस्ट लिहित आहे. ज्यात स्वातंत्र्यलढ्याच्या शूरवीरांच्या बलिदानाचा आणि शौर्याच्या कथांचा समावेश आहे.’

दरम्यान १२ ऑक्टोबला RT-PCR टेस्टनंतर त्यांच्या अहवाल निगेटिव्ह आला आहे. म्हणजे कोरोनामुक्त होण्यासाठी व्यंकय्या नायडू यांना दोन आठवडे लागले. याबाबत देखील त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे आणि कोरोनातून रिकव्हर होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहे.

त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या आरोग्याच्या देखरेखीची जबाबदारी सोपवलेल्या मेडिकल स्टाफ आणि डॉक्टरांचे देखील आभारी आहे. तसेच एम्सच्या एक्सपर्ट आणि सर्व डॉक्टरांचे आभारी आहे, ज्यांनी मला नेहमी सल्ला आणि योग्य मार्गदर्शन दिले. मी त्यांच्या सेवेवर खूप खुश आहे.’


हेही वाचा – Coronavirus: निगेटिव्ह असून रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला; भडकलेल्या युवकाची डॉक्टरला मारहाण


 

First Published on: October 14, 2020 3:28 PM
Exit mobile version