दिल्लीनंतर आता गुजरातमध्ये हिंसाचार!

दिल्लीनंतर आता गुजरातमध्ये हिंसाचार!

राजधानी दिल्लीमध्ये जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारातच विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर अज्ञातांनी हल्ला केल्यानंतर आता गुजरातच्या अहमदाबादमध्ये देखील या मुद्द्यावरून हिंसेची घटना घडल्याचं समोर आलं आहे. अहमदाबादमध्ये एनएसयूआय अर्थात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि एबीव्हीपी अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं. यामध्ये एनएसयूआयच्या काही सदस्यांना गंभीर इजा झाली. या प्रकरणी अद्याप कुणावर गुन्हा दाखल झालेला नाही. जेएनयूमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत होतं.

अहमदाबादमध्ये एनएसयूआयचे काही कार्यकर्ते एबीव्हीपीच्या कार्यालयाजवळ जेएनयूमधल्या घटनेचा निषेध करण्यासाठी घोषणाबाजी करत होते. या पार्श्वभूमीवर एबीव्हीपी आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये आधी बाचाबाची आणि त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं. जमावाला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेमध्ये एकूण १० जण जखमी झाले असून त्यातले काही गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Video – ‘म्हणून मी आंदोलनात ‘FREE KASHMIR’चं पोस्टर दाखवलं’, तरुणीचा अखेर खुलासा!
First Published on: January 7, 2020 2:11 PM
Exit mobile version