राम मंदिराचा जाहिरनाम्यात समावेश करा, पाठिंबा देऊ – विश्व हिंदू परिषद

राम मंदिराचा जाहिरनाम्यात समावेश करा, पाठिंबा देऊ – विश्व हिंदू परिषद

राम मंदिराचा प्रश्न हा देशातील एक संवेदनशील मुद्दा बनला आहे. गेल्या तीन ते चार दशकांपासून हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. २०१४ च्या लोकसभा निडणुकीत भाजपने राम मंदिर कुठल्याही परिस्थितीत बांधू, असे आश्वासन दिले होते. परंतु, पाच वर्ष होत आली तरीही सरकारला या राम मंदिर बांधता आलेले नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हात झटकले आहेत. राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल, तेव्हा लगेच मंदिराचे बांधकाम सुरु करु, असा पवित्रा मोदींनी घेतला आहे. दरम्यान, देशातील हिंदू संघटनांचा भाजपवरील विश्वास उडाल्याचे दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राम मंदिराची मागणी करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेने काँग्रेसला ऑफर दिली आहे. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात राम मंदिराचा समावेश केला, तर विश्व हिंदू परिषद पाठिंबा देईल, असे विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

जाहिरनाम्यात शेतकरी आणि रोजगारासंबंधित महत्त्वाचे मुद्दे

काँग्रेसने २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केली आहे. सध्या काँग्रेस या निवडणुकीच्या प्रचारासाठी जाहिरनामा बनवत आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनेक तज्ज्ञ व्यक्तींची भेट घेत आहेत. या जाहिरनाम्यात रोजगार आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे असणार आहेत. दरम्यान, काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात राम मंदिराचा मुद्दाही घेतला तर विश्व हिंदू परिषदव पाठिंबा देईल, असे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमारा म्हणाले आहेत. ते म्हणाला की, ‘राम मंदिरासाठी ज्यांनी अश्वासन दिले, त्यांना पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेसने आपल्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा समाविष्ट केला तर आम्ही पाठिंबा देण्याबाबत विचार करु. त्यांनी आरएसएसच्या स्वयंसेवकांच्या काँग्रेस प्रवेशावर घातलेली बंदी मागे घ्यावी’.

First Published on: January 20, 2019 12:20 PM
Exit mobile version