घरदेश-विदेश'राम मंदिरासाठी हिंदू समाज आणखी प्रतिक्षा करु शकत नाही'

‘राम मंदिरासाठी हिंदू समाज आणखी प्रतिक्षा करु शकत नाही’

Subscribe

राम मंदिरासाठी हिंदू समाज आता फार काळ प्रतिक्षा करु शकत नाही, असे विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले आहे. राम मंदिराचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून मंदिर बांधकामाला सुरुवात व्हावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून राम मंदिराचा मुंद्दा चर्चेत आहे. राम मंदिराचे बांधकाम लवकर सुरु व्हावे यासाठी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे देखील अयोध्याला जावून आले. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिरासाठी गेल्या महिन्यात अयोध्येत महासभेचे आयोजन केले होते. या महासभेत लाखो रामभक्त सहभागी झाले होते. तरीदेखील अध्यापही राम मंदिराचे बांधकाम सुरु झालेले नाही. राम मंदिराचा प्रश्न गेल्या ६९ वर्षांपासून न्यायालयात प्रलंबिधत आहे. हा प्रश्न लवकर मार्गी लावून राम मंदिर बांधायला सुरुवात करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद वारंवार करत आली आहे. दरम्यान, या संदर्भात मोठी महासभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, तरीही राम मंदिराचा बांधकाम सुरु झालेले नाही. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने बुधवारी दिल्ली येथे पत्रकार परिषद बोलावली होती. या परिषदेत हिंदू आता फार काळ प्रतिक्षा करु शकत नाही, असे स्पष्ट केले आहे.

‘याच अधिवेशनात राम मंदिरासाठी कायदा व्हावा’

विश्व हिंदू परिषदेने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, याच अधिवेशनात राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागायला हवा. याच अधिवेशनात राम मंदिरासाठी कायदा बनायला हवा. गेल्या ६९ वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. हिंदू समाजाने आणखी किती दिवस वाट पाहावी, असा सवाल विश्व हिंदू परिषदेने केला. या मुद्यावरुन न्यायालयात येत्या ४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. परंतु, यासाठी अद्यापही खंडपीठाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. अनेक अपिलांवर प्रक्रियाही झालेली नाही. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी कोसो दूर आहे. याबाबत हिंदू समाज मात्र फार काळ निर्णयाची प्रतिक्षा करु शकत नाही, असे विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले आहे. या संदर्भात आता ३१ जानेवारीला विश्व हिंदू परिषदेची प्रयागराज येथे धर्मसंसद असणार आहे. या धर्मसंसदेत राम मंदिरासाठी योग्य पाऊल उचलले जाणार असून जे संत सांगतील ते आम्हाला मान्य असल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -