अन्यथा राम मंदिराच्या निर्मितीला सुरुवात करणार; विहिंपचा इशारा

अन्यथा राम मंदिराच्या निर्मितीला सुरुवात करणार; विहिंपचा इशारा

विश्व हिंदु परिषद

अयोध्येत राम मंदिर निर्मितीसाठी सरकारने तात्काळ अध्यादेश आणून भव्य मंदिर उभारावे. अन्यथा हिंदूंच्या आस्थेचे प्रतिक असलेल्या भव्य राम मंदिराच्या निर्मितीला डिसेंबर महिन्यात सुरुवात केली जाईल, असा इशारा विश्व हिंदु परिषदेचे नेते मुकेश दुबे यांनी आज पालघर येथे पत्रकार परिषदेत दिला. विहिंपचे जिल्हा मंत्री सुशील शाह यांनी सांगितले की, राम लल्लाचे भव्य मंदिर निर्मितीसाठी देशभरात ५५० राम मंदिर निर्मिती संकल्प सभा घेऊन खासदारांना राम मंदिराच्या समर्थनार्थ उभे राहण्यासाठी निवेदन दिले जात आहे.

वाचा : अयोध्येत आज हिंदू विश्व परिषदेची महासभा

१९ डिसेंबरला गीता जयंती

बजरंग दलाचे जिल्हा संयोजक चंदन सिंह म्हणाले की, यंदा १९ डिसेंबर रोजी गीता जयंती आहे. त्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर गावोगावचे कार्यकर्ते मंदिराच्या मुद्यावर तरुणांमध्ये जागृती करत आहेत. मंदिर निर्मितीसाठी युवकांना कार सेवा करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले जाईल. पालघरमध्ये होणाऱ्या मंदिर निर्माण संकल्प सभेनिमित्त पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कुमक तैनात करण्यात आली आहे.

वाचा : ‘राम मंदिर नव्हे भगवान बुद्धांचे मंदिर हवे’

वाचा : भक्तांवरील अमानुष आणि गुंडशाही मारहाणीचा विश्व हिंदू परिषदेकडून निषेध

विहिंपने केले महासभेचे आयोजन 

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर अयोध्येत विश्व हिंदू परिषदेने महासभेचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिर बांधण्यासाठी सरकारवर दबाव आणावा यासाठी विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत महासभेचे आयोजन केले. राम मंदिरासाठी आयोध्येत होणारी ही शेवटची महासभा असेल, असे सांगितले केले. या महसभेसाठी अयोध्येत दोन ते तीन लाख रामभक्त येणार असल्याचे सांगितले गेले.

First Published on: November 29, 2018 10:13 PM
Exit mobile version