लॉकडाऊनविना कोरोनाविरुद्ध लढता येतं; दक्षिण कोरियाचं ‘3T’ मॉडेल यशस्वी

लॉकडाऊनविना कोरोनाविरुद्ध लढता येतं; दक्षिण कोरियाचं ‘3T’ मॉडेल यशस्वी

अमेरिका, चीन, इटली आणि भारत आदी जगातील सर्वच देश कोरोना विषाणूशी लढत आहेत. दुसरीकडे, तैवाननंतर दक्षिण कोरिया हा देश लस, अँटी बॉडी आणि मोठ्या प्रमाणात लॉकडाउन न घेता या आजारापासून मुक्त होऊ लागला आहे. दक्षिण कोरियामध्ये अनेक मार्गदर्शक सूचनांसह कार्यालये आणि संग्रहालये उघडण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्यावर अशी गर्दी नाही, परंतु आता पूर्वीसारखी शांतता नाही आहे. मे महिन्यातच शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. दक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूचे सुमारे १० हजार रुग्ण आहेत, ज्यात ९ हजाराहून अधिक लोक बरे झाले आहेत. मेच्या सुरूवातीस केवळ ३० प्रकरणे समोर आली आहेत. खरं तर, दक्षिण कोरियाने कोरोनाशी लढण्यासाठी ३ टी मॉडेलचा वापर केला आहे. याचा अर्थ ट्रेस, चाचणी आणि उपचार (ट्रेस, टेस्ट और ट्रीटमेंट). या मॉडेलची चर्चा एनडीटीव्हीचे रवीश कुमार यांनी त्यांच्या ‘प्राइम टाइम’ कार्यक्रमात केली आहे.

भारतात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत आणि संक्रमित लोकांची संख्या ५२,००० च्या पुढे गेली आहे. हा संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने १७ मेपर्यंत देश लॉकडाऊन केला आहे. जर एखादा देश जोखीम घेण्यास तयार नसेल तर देश लॉकडाऊन करावा लागेल. याचा सोपा अर्थ म्हणजे सरकारने त्यांची आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे. दक्षिण कोरियाने लॉकडाऊन केलं नाही, मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद नाहीत, परंतु चाचणी आणि आयसोलेशनवर बराच जोर देण्यात आला. आता तिथे रुग्णांची संख्या थांबू लागली आहे. संग्रहालये, ग्रंथालये आणि कार्यालये उघडत आहेत.


हेही वाचा – भारताच्या गेमचेंजर औषधाने केलं निराश; जगाला होती आशा


दक्षिण कोरियाच्या रस्त्यांवरील रहदारी सामान्य केली गेली नाही. हायस्कूल १३ मे आणि बालवाडी शाळा २० मे पासून सुरू होईल. १६ मार्चपासून दक्षिण कोरियामध्ये सक्रिय प्रकरणांची संख्या कमी होऊ लागली होती. एप्रिलमध्ये काही दिवस नवीन प्रकरणांची संख्या केवळ दोन किंवा तीन होती. मे महिन्यात केवळ ३० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. ७ मे रोजी नवीन प्रकरणांची संख्या केवळ सात होती. भारताने लॉकडाऊन केलं, ४४ दिवसानंतर एकही दिवस संक्रमितांची संख्या कमी झालेली नाही. दक्षिण कोरियामध्ये शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. दक्षिण कोरियामध्ये आतापर्यंत १०,८१० कोरोनाबाधित असून त्यापैकी ९,४१९ लोक बरे झाले आहेत आणि घरी गेले आहेत.

 

First Published on: May 8, 2020 3:39 PM
Exit mobile version