West Bengal Assembly Election 2021: बंगालच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

West Bengal Assembly Election 2021: बंगालच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

साऱ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. मतमोजणी सुरु असून सुरुवातीचे कल समोर आले आहेत. यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट होत आहे. या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जे सुरुवातीचे कल समोर आले आहेत यावरु शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. मात्र, सुरुवातीचे जे कल समोर आले आहेत यामध्ये तृणमूलला २०७ जागा तर भाजपला ८१ जागा मिळाल्या आहेत. एकप्रकारे तृणमूल बंगालमध्ये हॅट्ट्रीक मारणार असल्याचं स्पष्ट होतं. दरम्यान, शरद पवार यांनी ममता दीदींचं अभिनंद न केलं आहे.

शरद पवार यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी लोकांच्या भल्यासाठी तसंच करोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असंही म्हटलं आहे. शरद पवार यांनी ट्विट केलं आहे.

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींची मुसंडी, 1500 मतांची आघाडी

नंदीग्राममध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत सुरू असून सुरवातील पिछाडीवर असलेल्या ममता बॅनर्जींनी मुसंडी मारत १५०० मतांची आघाडी घेतली आहे.

 

First Published on: May 2, 2021 1:46 PM
Exit mobile version