Birbhum Violence : बीरभूम हिंसाचार प्रकरणात सीबीआयने 21 जणांना आरोपी म्हणून केले घोषित

Birbhum Violence : बीरभूम हिंसाचार प्रकरणात सीबीआयने 21 जणांना आरोपी म्हणून केले घोषित

Birbhum Violence : बीरभूम हिंसाचार प्रकरणात सीबीआयने 21 जणांना आरोपी म्हणून केले घोषित

गेल्या आठवड्यात 21 मार्च रोजी बीरभूम जिल्ह्यातील रामपूर हाट येथे काही अज्ञात लोकांनी दहा घरं जाळली. यात आठ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणाची कलकत्ता उच्च न्यायालयाने दखल घेत सीबीआयला चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी सीबीआयाने तपासादरम्यान 21 जणांना आरोपी म्हणून घोषित केले आहे.

या हिंसाचार प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचे 30 सदस्यीय पथक बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट येथे दाखल झाले. दरम्यान सीबीआयकडून आता संपूर्ण घटनेचा तपास सुरु आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या या हिंसाचारात दहा घरं पेटवून देण्यात आली. ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांसह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्वतःला तीन गटांमध्ये विभागून डीआयजी अखिलेश सिंह यांच्या नेतृत्वाखालील सीबीआयच्या पथकाने गावातील पूरबापारा भागाला भेट दिली. याठिकाणी स्थानिक टीएमसी नेते भादू शेख यांच्या हत्येनंतर ही घटना घडली होती.

सुत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयचे पथक शनिवारी बोगतुई येथे पाच तास थांबले. यावेळी प्रथम त्यांनी सोनू शेखच्या घरी भेट ज्याठिकाणीच गंभीररित्या जळलेल्या अवस्थेतील सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. सीबीआयच्या पथकाने सोनू शेखच्या घराची तपासणी केली, त्यानंतर शेजारील फतिक शेख आणि मिहिलाल शेख यांच्यासह इतर लोकांच्या घरी गेले.

या घटनेमागे अन्य काही कारण होते का?

सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (CSFL) च्या कर्मचार्‍यांसह व्हिडिओग्राफी व्यतिरिक्त, सीबीआय टीमने परिसराचे 3-डी स्कॅनिंग करत त्या ठिकाणाहून अनेक नमुने गोळा केले. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही आग घरांमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी लावली होती की या घटनेमागे आणखी काही कारण आहे याचाही तपास सुरु आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळावर उपस्थित प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्याची योजना असून परिसरातील सर्व रहिवाशांची तपशीलवार यादी तयार केली जात आहे. या घटनेवर प्रत्यक्षदर्शी आणि इतर गावकऱ्यांशी बोलणे आवश्यक असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

सीबीआयचे पथक या प्रकरणाच्या तपासासाठी बीरभूममध्ये राहणार आहे. तर सीबीआयची दुसरी टीम रामपुरहाट पोलिस ठाण्यात गेली असून त्यांनी तपासासंदर्भात केस डायरी आणि इतर संबंधित कागदपत्रांचा अभ्यास केला.

सीबीआय अधिकाऱ्यांनी शनिवारी आयजी (बर्धमान रेंज) बीएल मीना आणि बीरभूम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नागेंद्र त्रिपाठी यांच्यासोबत बैठक घेतली. कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी बीरभूम हिंसाचाराचा तपास सीबीआयकडे सोपवला आणि तपासातील प्रगतीचा अहवाल सादर करण्यासाठी 7 एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित केली.

केंद्रीय तपास यंत्रणांना ममता बॅनर्जींचा इशारा

या घटनेचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निषेध व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मला अजूनही वाटते की रामपुरहाट घटनेमागे एक षडयंत्र आहे. सीबीआयने या घटनेचा तपास स्वीकारला, हा एक चांगला निर्णय आहे, परंतु जर त्यांनी फक्त भाजपच्या निर्देशांचे पालन केले तर आम्ही विरोध करण्यास तयार आहोत.


China Plane Crash : चीनच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॕक बॉक्सचा तपास सुरू, १३२ जणांच्या फ्लाईटमध्ये सर्वांचाच मृत्यू झाल्याचे घोषित


First Published on: March 27, 2022 4:29 PM
Exit mobile version