दहावीच्या परिक्षेला बसणार १२ वर्षांची मुलगी!

दहावीच्या परिक्षेला बसणार १२ वर्षांची मुलगी!

प्रातिनिधिक फोटो

सैफा खातून या १२ वर्षांच्या मुलीला चक्क दहावीची परीक्षा देण्याची परवानगी, पश्चिम बंगाल माध्यमिक बोर्डाने दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सैफाने आजवर एकदाही शाळेची पायरी चढलेली नाही. पश्चिम बंगाल माध्यमिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणमॉय गांगुली यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘सैफाने फॉर्म नंबर १७ च्या माध्यमातून बाहेरुन परीक्षा देण्याची पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ही परीक्षा पार पडली होती. दरम्यान १२ वर्षांच्या मुलीने अशाप्रकारे दहावी इयत्तेची परीक्षा देण्याचा हा २० वर्षातील पहिलंच प्रकरण आहे.’ गांगुली पुढे म्हणाले, ‘दहावीची परीक्षा देण्यासाठी किमान १४ वर्षाची वयोमर्यादा लागते. मात्र, हावडाची रहिवाशी असलेल्या सैफाने पात्रता परिक्षेमध्ये ५२ टक्के मार्क मिळवत मुख्य परिक्षेसाठी आपण पात्र असल्याचे सिद्ध केले. या पात्रता परिक्षेचा निकार ११ ऑक्टोबर २०१८ ला जाहीर करण्यात आला होता.’


वाचा: SBI चा मोठा निर्णय; ‘या’ सेवेवर लागणार निर्बंध

दरम्यान माहिती बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सैफाचे वडील मोहम्मद ऐनुल यांनी आपल्या मुलीला दहावीच्या परिक्षेला बसू द्यावे अशी विनंती बोर्डाकडे केली होती. यापूर्वी ९० च्या दशकात असाच एक प्रकार उघडकीस आल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये एकूण २ हजार ८१९ जागांवर दहावी बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. १२ मार्च ते २१ मार्च या कालावधीमध्ये या परीक्षा होणार असून, सैफासह एकूण १० लाख विद्यार्थी या परिक्षेला बसणार आहेत. त्यापैकी ६ लाख २१ हजार ३६६ मुली आहेत तर, ४ लाख ८१ हजार ५५५ मुलं आहेत.


वाचा: RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा?

First Published on: October 31, 2018 12:28 PM
Exit mobile version