SBI चा मोठा निर्णय; ‘या’ सेवेवर लागणार निर्बंध

गेल्या काही काळात वाढलेलं एटीएम फ्रॉडचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन, हे नवे बदल करण्यात आल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

SBI platinum deposit scheme
SBI New Scheme: स्वस्त दरात होम लोनपासून ते Fixed deposit रकमेवर ग्राहकांना मिळणार लाभ

‘द स्टेट बँक ऑफ इंडिया’चा देशातील काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बँकांच्या यादीत समावेश होतो. दरम्यान, SBI ने काही महत्वाचे निर्णय घेतले असून येत्या २ महिन्यांत बँकेकडून ठराविक सेवा बंद करण्यात येणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे डेबिट कार्ड धारकांवर तसंच ऑनलाईन बँकिंग सेवांवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय बँकेतून रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेवरही निर्बंध घालण्यात येणार आहेत. हे सर्व बदल १ नोव्हेंबरपासून लागू होणार असून, क्लासिक आणि माएस्ट्रो डेबिट कार्डधारक एका दिवसाला केवळ २० हजार रुपयेच काढू शकणार आहेत. या नवीन निर्णयापूर्वी SBI चे खातेधारकांना एका दिवसाला ४० हजार रुपयापर्यंतची रक्कम काढणं शक्य होतं. मात्र, आता ही रक्कम थेट पन्नास टक्क्यांनी घटवण्यात आली आहे.


गेल्या काही काळात वाढलेलं एटीएम फ्रॉडचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन, हे नवे बदल करण्यात आल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय डिजीटल व्यवहारांना प्राधान्य देणं हेदेखील यामागचं एक कारण आहे. मात्र, दिवाळीचा सण ऐन ४ दिवसांवर येऊन ठेपला असताना SBI ने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांचे व्यवहार प्रभावित होणार असल्याचे चित्र आहे.