Whatsapp करतंय हेरगिरी? चौकशी करणार असल्याचं केंद्रीय मंत्र्यांचं आश्वासन

Whatsapp करतंय हेरगिरी? चौकशी करणार असल्याचं केंद्रीय मंत्र्यांचं आश्वासन

Whatsapp spying Union Ministers Rajeev Chandrashekhar assurance that he will investigate

इंटरनॅशनल कॉल्स आणि नोकऱ्यांमधून येणारे नको असलेले मेसेज यामुळे व्हॉट्सअॅपवर यूजर्सना एका नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अलीकडेच एका यूजरने उघड केले आहे की तो झोपेत असतानाही अॅप मायक्रोफोन वापरत आहे. ही बाब समोर येताच सरकारही सतर्क झाले असून, तत्काळ तपास करण्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्र्यांनी याला ‘गोपनीयतेचे उल्लंघन’ म्हटले आहे. ( Whatsapp spying Union Ministers Rajeev Chandrashekhar assurance that he will investigate )

ट्विटर यूजर फोद डबिरी यांनी शनिवारी ट्विट केले की, ‘मी झोपलो होतो आणि सकाळी 6 वाजता उठलो, या वेळी व्हॉट्सअॅप बॅकग्राउंडमध्ये मायक्रोफोन वापरत होतं. काय चाललंय?’ केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या ट्विटची दखल घेत ‘हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे आणि अस्वीकार्य आहे’ असे लिहिले आहे. त्यांनी पुढे सांगितले की आम्ही या प्रकरणाची त्वरित चौकशी करत आहोत आणि Wahtsapp कोणत्याही बाबींचं उल्लंघन करत असले तर कारवाई करू, असं केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय कॉल

अलीकडे, अनेक वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅपवर आंतरराष्ट्रीय नंबरवरून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलबद्दल तक्रार केली. यासंदर्भात कंपनीकडून निवेदनही जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये युजर्सनी हे नंबर ब्लॉक करून रिपोर्ट करावेत असे म्हटले होते. तसेच, कंपनीने त्यांना धोकादायक म्हटले होते आणि अशा कॉलला उत्तर देऊ नका असा सल्ला दिला होता.

( हेही वाचा: मनोज वाजपेयीच्या चित्रपटावर बंदीची मागणी, आसाराम बापूंच्या जीवनावर आधारित सिनेमा )

लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान

व्हॉट्सअॅप मेसेजमुळे अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. झिरोधाचे सीईओ निखिल कामत यांनीही अशाच एका घटनेचा उल्लेख केला ज्यामध्ये त्यांच्या जवळच्या मित्राची ५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. व्हॉट्सअॅपवर अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज लोकांना पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवत आहेत.

( हेही वाचा: पॉर्न बघून अल्पवयीन मुलींचा घ्यायचा शोध, नराधमाने ३० मुलींना केलं शिकार )

First Published on: May 10, 2023 2:45 PM
Exit mobile version