Covid vaccine: लस घेतली नाही तर नागरिकांचं सिम होणार बंद! ‘या’ देशाने घेतला निर्णय

Covid vaccine: लस घेतली नाही तर नागरिकांचं सिम होणार बंद! ‘या’ देशाने घेतला निर्णय

देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र पाकिस्तानच्या पंजाब सरकारने कोविड -१९ लसीकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोन दूर करण्यासाठी एक अनपेक्षित पाऊल उचलले आहे. हा निर्णय ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.. या देशातील नागरिकांनी कोरोनाची लस घेतली नाही तर त्यांच्या मोबाइल फोनचे सिमकार्ड ब्लॉक केले जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. प्रांतीय आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन राशीद यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे उद्दीष्ट शक्य तितक्या लोकांना लसीकरण करणे हे असल्याचे सांगितले जात आहे.

डॉ. राशीद यांनी दिलेल्या माहितीनुसार, “राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू असताना लसीकरण झाल्याने कोविड -१९ मधील प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.” यासह ते असेही म्हणाले की, कोविड -१९ लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची साधारण संख्या ३ लाख ते ४ लाख असून हे लोक दुसर्‍या डोस घेण्यापर्यंत अद्याप पोहोचले नाहीत. दरम्यान, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम २ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

असं होणार मोबाईल सिम बंद?

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा लोकांना ज्यांनी लसी दिली नाही आणि लससाठी नोंदणी केलेली नाही, त्यांना पहिल्या टप्प्यात इशारा देण्यात येईल. त्यांच्यासाठी कोविड -१९ ची लस घेण्यासाठी लवकरात लवकर नाव नोंदवून त्यांची वेळ निश्चित केली जाईल. पुढील टप्प्यात, त्यांनी लस घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही तर त्यांच्या ओळखपत्रांशी जोडलेले सिम कार्ड ब्लॉक करण्यात येतील. कोविड -१९ लस घेतल्यानंतर मोबाइलच्या सिमकार्ड पुन्हा त्याच स्थितीत सुरू करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पंजाबमधील ५० लाखाहून अधिक लोकांना कोविड -१९ ची लस देण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, अद्याप संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांची संख्या १० लाखांच्या जवळपास आहे. शासनाने सुरुवातीला ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण मोहीम सुरू केली होती. सध्या, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस देण्यास सुरूवात केली आहे.


Vaccine: अमेरिकेने जगभरात पाठवल्या ५.५ करोड लसीपैंकी भारताला मिळणार…

First Published on: June 22, 2021 2:52 PM
Exit mobile version