घरCORONA UPDATEVaccine: अमेरिकेने जगभरात पाठवल्या ५.५ करोड लसीपैंकी भारताला मिळणार २०...

Vaccine: अमेरिकेने जगभरात पाठवल्या ५.५ करोड लसीपैंकी भारताला मिळणार २० लाख लसी

Subscribe

भारत, बांग्लादेश यासारख्या आशियायी देशांना १.६ कोटी लसी देण्यात येणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी सोमवारी एकूण ८ करोड लसींच्या डोसपैकी ५.५ करोड लसींच्या डोसाच्या वितरणाची घोषणा केली. याआधी अमेरिकेने २.५ करोड लसी देण्याची घोषणा केली होती. हे सर्व मिळून जो बायडेन यांनी ८ कोटी लसींचे वितरण करण्याचे जाहीर केले आहे. यात भारत, बांग्लादेश यासारख्या आशियायी देशांना १.६ कोटी लसी देण्यात येणार आहेत. १.६ कोटी लसींमधील २० लाख लसींचे डोस भारताला मिळणार आहेत. २.५ करोड लसींच्या वितरणाच्या पहिल्या टप्प्यात भारताला जवळपास २० ते ३० लाख लसींचे डोस मिळण्याची शक्यता आहे. ( Vaccine: India get 20 lakh vaccines out of 55 million vaccines sent by US)

व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जगभरात कोरोना महामारी नष्ट करण्यासाठी आपण लढा देणे सुरु ठेवला आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण जगाला लस देण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत आठ कोटी लसींचे वितरण केले जाईल, असे देखील जो बायडन यांनी म्हटले आहे. या आठ कोटी पैंकी लसींपैकी ७५ टक्के लसी कोव्हॅक्सिन मोहिमेद्वारे वितरीत केल्या जाणार आहेत. तर २५ टक्के लसी या कोरोनाचे सर्वात जास्त संक्रमण झालेल्या देशांना देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

भारतात आतापर्यंत २८ कोटी ८७ लाख ६६ हजार २०१ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात सध्या कोव्हिशिल्ड,कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक व्ही या तीन लसी देण्यात येत आहेत. देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ६४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात आता कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा धोका उद्भवला आहे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असतानाच देशाला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा सामना करावा लागतो आहे.


हेही वाचा – Coronavirus India Update: दिलासादायक! तीन महिन्यानंतर आज ५० हजारांहून कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -