हवेमार्फत पसरतो कोरोना, WHO ने केले मान्य!

हवेमार्फत पसरतो कोरोना, WHO ने केले मान्य!

जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंगळवारी हवेमार्फेत कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेला नाकारता येत नाही, अशी कबुली दिली आहे. तर डब्ल्यूएचओने जगभरात २०० पेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी कोरोनाचा विषाणू हवेमार्फत पसरू शकतो तसेच प्रादुर्भाव झाल्याचे पुरावेही स्वीकारले आहेत. शास्त्रज्ञांच्या या समुहाने डब्ल्यूएचओला कोरोना विषाणूसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यास सांगितले आहे.

डब्ल्यूएचओमध्ये कोरोना महामारीचे तांत्रिक प्रमुख मारिया वान केरखोव (Van Kerkhove) यांनी असे सांगितले की, आम्ही कोरोना संक्रमणाच्या एअरबोर्न ट्रान्समिशन (airborne transmission) आणि एअरोसोल ट्रान्समिशन (aerosol transmission) या दोन्ही पद्धतींबद्दल सध्या चर्चा करत असून हवेमार्फत कोरोनाचा विषाणू पसरू शकतो, या संकल्पनेला नाकारू शकत नाही, असेही ते म्हणाले.


शंभर शास्त्रज्ञांचा दावा; हवेमार्फत पसरतो कोरोना! WHO कडे संशोधनाची मागणी


मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि नियंत्रणासाठी डब्ल्यूएचओची तांत्रिक प्रमुख बेनेडेटा अल्लेग्रांज़ी यांनी सांगितले की, हवेमार्फत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे पुरावे अस्तित्त्वात होते, परंतु ते खात्रीशीर नव्हते. ते असेही म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी हवेमार्फत कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः विशिष्ट परिस्थितीत गर्दीची जागा, बंद जागा, ज्याठिकाणी हवेचे योग्य परिवहन होत नाही, तेथे धोका निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे ते पुरावे गोळा करून हे स्पष्ट करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या पुराव्यांचे आम्ही समर्थन करतो. कोरोना संसर्गाच्या जोखमीत डब्ल्यूएचओ मूल्यांकनात होणार्‍या कोणत्याही बदलाचा परिणाम १ मीटर (३.३ फूट) शारीरिक अंतर राखण्यास सध्याच्या सल्ल्यावरही परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, डब्ल्यूएचओ येत्या काळात व्हायरसच्या प्रसाराची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी संक्षिप्त वैज्ञानिक विवरण प्रकाशित करेल, असे डब्ल्यूएचओमधील कोरोना महामारीचे तांत्रिक प्रमुख वान केरखोव (Van Kerkhove) यांनी सांगितले.

First Published on: July 8, 2020 10:40 AM
Exit mobile version