Covid-19 विषाणूच्या उगमाबाबत चीनला अधिक माहिती देण्यास भाग पाडू शकत नाही – WHO

Covid-19 विषाणूच्या उगमाबाबत चीनला अधिक माहिती देण्यास भाग पाडू शकत नाही – WHO

Covid-19 विषाणूच्या उगमाबाबत चीनला अधिक माहिती देण्यास भाग पाडू शकत नाही - WHO

संपूर्ण जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला. काही देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र अजूनही काही देश कोरोनाशी लढत आहे. जगभरात कोरोनामुळे ३७ लाखांहून अधिक लोकांनी जीव गमवाला आहे. कोरोना काळाच्या सुरुवातीपासून चीनमधून कोरोनाचा उगम झाल्याचे म्हटले जात आहे. काही जण चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून कोरोना पसरल्याचे म्हणत आहेत. तर काही जण चीनच्या मटण बाजारातून कोरोनाचा उगम झाल्याचे म्हणत आहे. पण अजूनही कोरोनाचा उगम कुठून झाला याचे ठोस पुरावे मिळाले नाही आहेत. मागच्या वर्षी कोरोनाचा उगम शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) पथक चीनला गेले होते. मात्र आता जागतिक आरोग्य संघटना म्हणतंय की, कोरोना विषाणूच्या उगमाबाबत चीनला अधिक माहिती देण्यास भाग पाडू शकत नाही.

एएमआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटना म्हणाली की, कोरोना विषाणूबाबत अधिक माहिती देण्यास WHO भाग पाडू शकत नाही. पण कोरोना कुठून आला आणि कसा जगभरात पसरला याच्या तपासावर जोर दिला जाईल.

जगभरात पसरलेला जीवघेण्या कोरोनाचे मूळ शोधण्याच्या प्रयत्न करणारी अमेरिका यापुढी ड्रॅगनच्या विरोधात शांत होण्याच्या मनस्थितीत नाही आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांना कोरोनाला जबाबदार चीन असल्याचे म्हणतं सांगितले की, ‘जर कोरोना नष्ट करायचे असेल आणि भविष्यात या महामारीपासून वाचायचे असेल तर याच्या मूळाशी जावे लागेल. पण चीन अजूनही जसा तपास करायला पाहिजे तसा तपास करू देत नाही आहे.’ वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या १७ कोटी ४३ लाख ७० हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत ३७ लाख ५१ हजार जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ७६ लाख २० हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – कोरोना उपचारांसाठी आता ‘या’ औषध आणि चाचण्यांचा वापर बंद


 

First Published on: June 8, 2021 8:21 AM
Exit mobile version