Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE कोरोना उपचारांसाठी आता 'या' औषध आणि चाचण्यांचा वापर बंद

कोरोना उपचारांसाठी आता ‘या’ औषध आणि चाचण्यांचा वापर बंद

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोणत्याही उपचारांची गरज नाही.

Related Story

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सर्व प्रकारच्या औषधांचा वापर करण्यास नकार दिला आहे. आता सौम्य लक्षणे किंवा एसिम्टमॅटिक लक्षणे असणाऱ्या रुग्णांना थंडी तापाचे औषध दिले जाणार आहे. डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस (DGHS)ने कोरोनापासून बचावण्यासाठी मास्क घालणे,सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे,सतत हात धुणे यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना सर्व औषधांचा वापर करण्यास नकार देण्यात आला आहे कारण, या औषधांमध्ये हायड्रॉक्लोरोक्विन इव्हर्मेक्टिन,डॉक्सीसाइक्लिन,झिंक,मल्टीव्हिटॅमिन इत्यादींचा समावेश असतो. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना सीटी स्कॅनसारख्या चाचण्या करु नये असे सांगण्यात आले आहे.  ( Stop using this drug and tests for corona treatment now- health ministry )

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोणत्याही उपचारांची गरज नाही. आधी असलेल्या आजारांची औषधे हे रुग्ण घेऊ शकतात. ज्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत त्यांनी संतुलित आहार घ्यावा आणि योग्य प्रमाणात पाणी प्यावे, असा सल्ला DGHS ने दिला आहे.

‘या’ औषध आणि चाचण्यांच्या वापरावर बंदी

  • रेमडेसिवीरचा वापर केवळ रुग्णालयात दाखल झालेल्या तीव्र आणि गंभीर रुग्णांसाठी करण्यात येईल. कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जाणार नाही. हे इंजेक्शन घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.
  • एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनी गरज पूर्ण करुनही २४ ते ४८ तासात त्यात कोणतीही सुधारणा होत नसेल तर त्याला स्टिरॉइड टॉसिलीझुमब दिले जाऊ शकते. त्याचप्रमाणे एखाद्या रुग्णामध्ये C-Reactive Protein ७५ml मध्ये वाढ होत असेल तर त्याला हे औषध दिले जाऊ शकते.
  • कोरोनाच्या मध्यम किंवा तीव्र रुग्णांमध्ये मोलेक्यूलर हेपरिनचे डोस वापरले जाऊ शकतात.
  • सौम्य लक्षणे असणाऱ्यांनी किंवा तीव्र लक्षणे असणाऱ्यांनीही सतत HR-CT करु नये. HR-CTमधून येणाऱ्या रेडिएशनमुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – देशात 18+ मोफत लसीची घोषणा, मग खासगी हॉस्पिटलमध्ये लस विकत का घ्यायची ? – राहुल गांधी

- Advertisement -