Corona Virus : कोरोनाचा नवा व्हेरिएंट धोकादायक मात्र खात्मा तेव्हाच…., WHO प्रमुखांचे मोठं विधान

Corona Virus : कोरोनाचा नवा व्हेरिएंट धोकादायक मात्र खात्मा तेव्हाच…., WHO प्रमुखांचे मोठं विधान

Corona Virus : कोरोनाचा नवा व्हेरिएंट धोकादायक मात्र खात्मा तेव्हाच...., WHO प्रमुखांचे मोठं विधान

कोरोना वायरस आणि कोरोनाच्या अधिक व्हेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढली आहे. यामध्ये आता WHO प्रमुखांनी मोठं विधान केलं आहे. कोरना महामारीच्या तिसऱ्या वर्षात आपण प्रवेश करु अशी कधी कल्पना केली नव्हती. परंतु आपण जर ठरवलं कोरोना वायरसच्या महामारीचा खात्मा करायचाच तरच कोरोनाचा खात्म करणं शक्य होईल असे वक्तव्य WHO प्रमुख टेड्रोस एनॉम गेब्रेयसस यांनी केले आहे. तसेच जगातील सगळ्या देशांचे हेच ध्येय असले पाहिजे असेही त्यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट धोकादायक असल्याचा इशारासुद्धा यावेळी त्यांनी दिला आहे. म्यूनिख सुरक्षा सम्मेलन 2022 च्या लाईव्ह सेशनमध्ये ते संवाद साधत होते.

WHO प्रमुख टेड्रोस एनॉम गेब्रेयसस म्हणाले की, कोरोना महामारीचे आपले मूल्यांकन आहे. हा वायसर एखाद्या स्फोटासारखा पसरला आणि नंतर तो कमी झाला. परंतु कालांतराने पुन्हा एका स्फोटासारखा पसरला. कोरोनाचे अधिक संक्रमण धोका वाढवू शकते. परंतु यंदाच्या वर्षात आपण या जागतिक महामारीचा खात्मा करु शकतो. कोरोनाप्रतिबंधक लसींबरोबर काही देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या वाढत असल्याची माहिती समोर आली होती. तर काही देशांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, महामारी संपली आहे असे डॉ. गेब्रेयसस म्हणाले आहेत.

एका आठवड्यात 70,000 लोक उपचार मिळूनसुद्धा आजारामुळे मृत्यू पावले आहेत. आफ्रिकेच्या 83% लोकसंख्येला अद्याप लसीचा एक डोस मिळालेला नाही. जेव्हा आरोग्य यंत्रणेवर लोड ताण जाणवतो तेव्हा नाही. जेव्हा आपल्याकडे अत्यंत पारगम्य विषाणू जो अनियंत्रितपणे फिरत आहे. अशा परिस्थितीमध्येसुद्धा काही देशात कोरोना संपला असल्याच्या भयानक कथा सांगितल्या जात आहेत असे डॉ. गेब्रेयसस म्हणाले.

2019 मध्ये पहिल्यांदा चीनमधून संसर्गाच्या रूपात सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या साथीने जगावर वाईट परिणाम केला. तेव्हापासून हा विषाणू विकसित झाला आहे. जागतिक स्तरावर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक लोकांना संसर्ग झाला आहे.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात 1 हजार 635 कोरोनाबाधितांची नोंद, 29 जणांचा मृत्यू

First Published on: February 19, 2022 9:24 PM
Exit mobile version