Omicron variant : ओमिक्रॉन व्हेरियंटला रोखण्यासाठी काय आहेत उपाय?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

Omicron variant : ओमिक्रॉन व्हेरियंटला रोखण्यासाठी काय आहेत उपाय?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

दक्षिण आफ्रिकेसह संपूर्ण जगभरात ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. देशाताही काही राज्यांत ओमिक्रॉन विषाणने शिरकाव केला असून या व्हेरियंटला संपवण्यासाठी अधिक कालावधी लागू शकतो. पश्चिमी प्रशांतसाठी डब्ल्यूएचओचे क्षेत्रिय निदेशक डॉ. ताकेशी कसाई यांनी सांगितलं की, देशातील काही भागांत कोविड-१९ चा प्रसार अद्यापही होत असल्यामुळे तेथील नागरिकांना कोरोनाचा सामना करावा लागत आहे. मात्र, देशातील मृत्यूच्या संख्येत घट होत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

कसाई यांनी सांगितलं की, सीमेवर नियंत्रण ठेवल्यानंतर कोरोना व्हायरसचा कहर होण्यापासून आपल्याला मोठी मदत मिळू शकते. प्रत्येक नागरिक आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. परंतु आता कोविड-१९ च्या नव्या व्हेरियंटने धूमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या बाबतीत अद्यापही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आपल्याला या व्हेरियंटची दिशा बदलावी लागणार आहे. नव्या व्हेरियंटमध्ये अनेक गोष्टी आपल्याला माहिती नाहीये. या व्हेरियंटचा संक्रमण मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये होतं का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. या व्हेरियंटचे अनेक प्रकार असू शकतात. ज्यामध्ये परीक्षण आणि अवलोकन करण्याची आवश्यकता आहे.

ओमिक्रॉनला व्हेरियंट ऑफ कन्सर्न घोषित करण्यात आलंय. कारण हा व्हायरस इतर व्हायरसच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात संक्रमित होत आहे. लोकांमध्ये लगेच वावर करतो. म्युटेशनच्या संख्येमुळे ओमिक्रॉनला व्हेरियंट ऑफ कन्सर्न असं नाव घोषित करण्यात आलंय. पश्चिमी प्रशांत क्षेत्रातील चार देश आणि क्षेत्रातील ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये ओमिक्रॉनच्या व्हेरियंटची सुचना देण्यात आली आहे.

मागील काही वर्षात आम्हाला कोरोना विषाणूचा मोठा अनुभव आला आहे. विशेषत: डेल्टा व्हायरसवर प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, यामध्ये कोरोनाची लस घेणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे, सतत मास्क घालणे आणि इतर उपाय सुद्धा केले जाऊ शकतात. हा विषाणू थांबवण्यासाठी आयसीयू बेड आणि इतर यंत्रणांची सेवा सुविधा उपलब्ध करणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा: Bank Strike : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! डिसेंबर महिन्यातील २ दिवसांसाठी बँकेकडून संपाची


 

First Published on: December 3, 2021 6:32 PM
Exit mobile version