September WPI: घाऊक महागाई दरात घट, दिवाळीपूर्वीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा

September WPI: घाऊक महागाई दरात घट, दिवाळीपूर्वीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा

सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांना महागाईबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. मागील महिन्यात घाऊक महागाईचा दर १०.७० टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. तर ऑगस्ट महिन्यात हा महागाई दर १२.४१ टक्क्यांवर होता. परंतु सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईच्या दरात घसरण झाल्याने सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खाद्यपदार्थांच्या किंमतीत किंचित घट झाल्याने घाऊक महागाईचा दर घटला असल्याचे समोर आले आहे.

मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर ११.८ टक्क्यांवर आला होता. त्यानंतर आता यावर्षी घाऊक महागाईचा दर १०.७० टक्के इतका झाला आहे. मे महिन्यात घाऊक महागाई दराने १५.८८ टक्के इतका आकडा गाठला होता. सप्टेंबरपासून सलग १० महिने घाऊक महागाईचा दर हा १० टक्क्यांहून अधिका राहिला आहे.

सप्टेंबरमध्ये इंधन आणि उर्जेचा दर ३३.६७ टक्क्यांवरून ३२.६१ टक्क्यांवर घसरला. त्याच वेळी उत्पादन क्षेत्रातील महागाई दर महिन्याच्या आधारावर ७.५१ टक्क्यांवरून ६.३४ टक्क्यांवर आली आहे. सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईत सलग चौथ्या महिन्यात घट झाली आहे. खाद्यपदार्थ आणि उत्पादित वस्तूंच्या किमती घटल्यामुळे घाऊक महागाई कमी राहिली आहे.

बटाट्याच्या घाऊक महागाईचा दर ऑगस्टमधील ४३.५६ टक्क्यांवरून ४९.७९ टक्क्यांवर आला आहे. तर कांद्याचा महागाई दर -२४.७६ टक्क्यांवरून -२०.९६ टक्के झाला आहे. अंडी, मांस आणि मासे यांचा डब्लूपीआय ३.६३ टक्क्यांवर आला आहे.


हेही वाचा : MCA निवडणुकीत पवार-शेलार पॅनलकडून अमोल काळेंच्या नावाची घोषणा


 

First Published on: October 14, 2022 5:42 PM
Exit mobile version