घरताज्या घडामोडीMCA निवडणुकीत पवार-शेलार पॅनलकडून अमोल काळेंच्या नावाची घोषणा

MCA निवडणुकीत पवार-शेलार पॅनलकडून अमोल काळेंच्या नावाची घोषणा

Subscribe

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला काहीच दिवस बाकी आहेत. ही निवडणूक येत्या २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. परंतु या निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आता एकत्रितपणे संयुक्त पॅनल घेत मैदानात उतरले आहेत. परंतु एमसीएच्या अध्यक्षपदाचा तिढा आता सुटला असून पवार-शेलार पॅनलकडून अमोल काळेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी अमोल काळे विरुद्ध संदीप पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे.

एमसीए कार्यकारिणीच्या निवडणुकीत पवार-शेलारांच्या संयुक्त पॅनेलकडून अध्यक्षपदाची निवडणूक कोण लढवणार, यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु पवार-शेलार यांच्या पॅनेलकडून अमोल काळेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अमोल काळे हे नागपूरचे असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

आशिष शेलार हे बीसीसीआय निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. खजिनदार पदासाठी त्यांनी अर्ज भरला असल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. शेलार बीसीसीआयच्या खजिनदारपदावर बिनविरोध निवडून येणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे अमोल काळे आणि संजय नाईक या दोघांकडून अध्यक्षपदासह विविध पदांसाठी अर्ज करण्यात आला होता.


हेही वाचा : MCA निवडणुकीमध्ये शरद पवार-आशिष शेलारांचे संयुक्त पॅनल, अजून कोण कोण असणार?

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -