गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी महागणार? जाणून घ्या सध्याचा दर

गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी महागणार? जाणून घ्या सध्याचा दर

सध्या सगळीकडे लग्नसमारंभ आणि सणासुदीचे वातावरण आहे. लग्नकार्यांसोबतच गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर देखील अनेकजण सोनं-चांदी खरेदी करण्यास पसंती देतात. अशातच आता सोन्याची आणि चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या सोन्याचा दर किती?

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत असून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होण्याची देखील अधिक शक्यता वर्तवली जात आहे. काल समोर आलेल्या दरानुसार, 24 कॅरेटचे 8 ग्रॅम सोनं हे 45,344 रूपये प्रति ग्रॅम होते. तर 1 ग्रॅम सोनं हे 5,668 रूपये इतकी किंमत होती. तर 22 कॅरेट सोनं हे 8 ग्रॅमसाठी 43,184 रूपये तर 1 ग्रॅमसाठी 5,398 रूपये एवढ्या किंमतत आहे. तसेच आज 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 56,680 रूपये प्रति 10 ग्रॅम असून 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 53,980 प्रति 10 ग्रॅम आहे.

दरम्यान, काल (बुधवार) सोने आणि चांदीच्या किमतीत जरा घसरण पाहायला मिळाली. मागील काही दिवसांपासून 58,000 रूपयांची वाढ सोन्याच्या दरात झाली आहे.

सध्या चांदीचा दर किती?

येत्या काही दिवसांत चांदीची किंमत पाहता 80,000 प्रति किलोनं वाढू शकतं. सध्या चांदीचे दर हे 71,000 रूपये प्रति किलो आहे. येत्या काळात या किमतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळतील.


हेही वाचा :

१ एप्रिलपासून सोने खरेदीत होणार बदल, सरकराने जारी केले नवे नियम

First Published on: March 16, 2023 1:24 PM
Exit mobile version