‘टायटॅनिक पोज’ महिलेला पडली महागात – बघा व्हिडिओ

‘टायटॅनिक पोज’ महिलेला पडली महागात – बघा व्हिडिओ

दुर्घटनाग्रस्त महिला

प्रेक्षणीय स्थळांवर भेट देतांना आपल्याला सेल्फीचा मोह आवरत नाही. सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना नेहेमी समोर येतात. अनेक प्रेक्षणीय स्थळांवर सेल्फी न घेण्याचेही बोर्ड लावलेले असतात. मात्र अनेकदा नागरिक या बोर्डांकडे काना डोळा करतात. सुचना न पाळल्यामुळे अनेक नागरिकांना दुर्घटनांचा समना करावा लागतो. अशीच एक घटना इंडोनेशियात घडली आहे. सेल्फीसाठी ‘टायटॅनिक पोज’ देत असताना या महिलेला लाटेने झोडपले आहे. ही लाट इतकी जोरात आली की या महिलेला गंभीर दुखापत झाली. या ठिकाणी दगड असल्यामुळे महिलेला जखमाही झाल्या आहेत. हा फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आल्यानंतर लोकांनीही या महिलेला सहानुभूती दर्शवली आहे.

लोकांनी दिल्यात अशा प्रतिक्रिया

First Published on: March 24, 2019 11:47 AM
Exit mobile version