कोरोना महामारीमुळे दुसऱ्यांदा आई होण्यास महिलांकडून टाळाटाळ!

कोरोना महामारीमुळे दुसऱ्यांदा आई होण्यास महिलांकडून टाळाटाळ!

coronavirus and pregnancy

गेल्या दीड वर्षांपासून देशासह जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशापरिस्थितीत लहानमुलांसह सर्वच वयोगटातील व्यक्तींवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे सतत घरी असल्याने माणसांच्या वागण्या-बोलण्यात, वावरण्यासह वर्तवणूकीत देखील मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. मात्र जामा नेटवर्क जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, असे समोर आले की, कोरोना महामारीच्या आधी पुन्हा आई होण्याचे स्वप्न असलेल्या महिलांनी त्यांच्या या स्वप्नाला पुढे ढकलल्याचे किंवा टाळले असल्याचे दिसून आले आहे. तसेच या अहवालानुसार, ज्या माता न्यूयॉर्कमध्ये पुन्हा आई बनू इच्छितात त्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीमुळे पुन्हा गर्भधारणा करण्यास संकोच करत आहेत.

न्यूयॉर्क विद्यापीठाच्या ग्रॉसमॅन स्कूल ऑफ मेडिसिनने न्यूयॉर्क शहरातील १ हजार १७९ महिलांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा दावा करण्यात आला आहे. यानुसार, एक तृतीयांश महिला कोरोना महामारीच्या आधी पुन्हा आई होण्याची योजना करत होत्या, परंतु कोरोना व्हायरसच्या थैमानानंतर त्यांनी ती पुढे ढकलली. एपिडेमियोलॉजिस्ट आणि मुख्य संशोधक डॉ. लिंडा कान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना साथीच्या काळात स्त्रियांना गर्भधारणेच्या धोक्यांविषयी जागरूक झाले आहे. या काळात गर्भधारणा झाल्यास आई आणि मुलासाठी धोकादायक आहे. तसेच रुग्णालयांमध्ये कोरोना संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. म्हणूनच या काळात महिला गर्भधारणा होण्यास टाळत असले तरी हा एक चांगला निर्णय आहे.

ब्रिटिश मेडिकल जनरलने आपल्या संपादकीयात इम्पीरियल कॉलेज लंडन येथील प्रजनन तज्ज्ञ डॉ. व्हिक्टोरिया माले यांनी असे सांगितले की, कोरोना लसीकरणानंतर महिलांच्या मासिक पाळीमध्ये काही समस्या असल्यास तपासणीची गरज आहे. त्यामुळे सर्वप्रथम कोरोना लस आणि मासिक पाळीचा संबंधांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यांनी असे म्हटले की, आतापर्यंत ब्रिटनच्या मेडिसिन अँड हेल्थ केअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीकडे ३० हजार रूग्णांची नोंद करण्यात आली असून ज्यात महिलांनी लसीकरणानंतर मासिक पाळीत अडचण किंवा जास्त रक्तस्त्राव झाल्याची तक्रार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत लसीचा प्रजननक्षमतेवर विपरीत परिणाम झाल्याचे कोणतेही संकेत समोर आले नाहीत. मात्र महिलांच्या तक्रारींवर सतर्क राहण्याची गरज आहे.तसेच कोरोना लसीकरणानंतर मासिक पाळीतील अनियमितता देखील दिसून आल्याच्या काही तक्रारी आहेत.


E-Auction: मोदींच्या भेटवस्तूंचा आज ई लिलाव; ऑलिम्पिक खेळाडूंच्या जॅव्हेलिन, बॅडमिंटन, हॉकी स्टिकचा समावेश

First Published on: September 17, 2021 1:31 PM
Exit mobile version