World Nature Conservation Day: जागतिक निसर्ग संवर्धन दिन का साजरा केला जातो? काय त्यामागचा इतिहास जाणून घ्या

World Nature Conservation Day:  जागतिक निसर्ग संवर्धन दिन  का साजरा केला जातो? काय त्यामागचा इतिहास जाणून घ्या

World Nature Conservation Day: जागतिक निसर्ग संवर्धन दिन का साजरा केला जातो? काय त्यामागचा इतिहास जाणून घ्या

चांगले पर्यावरण आणि निरोगी मानवी समाजासाठी आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. दरवर्षी २८ जुलै हा दिवस जगभरात जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून ओळखला जातो. पृथ्वीच्या पर्यावरणातून नामशेष होत असलेली वृक्ष आणि प्राण्यांचे संरक्षण करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. जागतिक निसर्ग संवर्धन दिवस साजरा करण्याचे महत्त्व आणि त्याचा इतिहास जाणून घ्या. (World Nature Conservation Day: Why is World Nature Conservation Day celebrated?)

पाणी, वायु,माती, उर्जा, वनस्पती, खनिज,जीव जंतु यासारख्या निसर्गातील विविध घटकांचे संरक्षण करुन निसर्गाची सुंदरता अबाधित राखणे हे निसर्ग संवर्धन दिनाचे प्रमुख महत्त्व आहे. प्रसिद्ध रुस लेखक लियो टॉलस्टॉयउघ्दृत यांनी असे म्हटले आहे की, माणूस आणि निसर्गामध्ये असलेली साखळी कधीच तोडू नये ही आनंद मिळवण्यासाठीची पहिली अट आहे. एक उत्तम पर्यावरण एक स्थिर आणि उत्पादक समाजाला मिळालेली देणगी आहे. वर्तमान आणि भविष्यात पुढच्या पिढीचे आयुष्य सुनिश्चित करण्यासाठी निसर्गाचे संवर्धन, त्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचा इतिहास फारसा कोणाला माहिती नाही. मात्र २८ जुलै हा दिवस दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मानवाने आपल्या सुख सोयीसोयींसाठी निसर्गाच्या केलेल्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा आजचा दिवस आहे. निसर्गाचे आपल्या परिने कसे संवर्धन करता येईल यासाठी एक पाऊल उचलणे, जनजागृती करण्याचे काम आजच्या दिवशी केले जाते. निसर्गाचे संवर्धन न केल्याने माणसांना ग्लोबल वॉर्मिंग, विविध आजार, वातावरणीय बदल, प्राकृतिक बदलांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला चांगले आयुष्य हवे असल्यास आपल्या जवळ असलेल्या सुंदर निसर्गाचे संगोपन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – नाटेकर… क्रीडा, कलेत रमणारा अवलिया!

First Published on: July 28, 2021 12:08 PM
Exit mobile version