World Photography Day 2022: जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या वर्ल्ड फोटोग्राफी डेचा इतिहास जाणून घ्या

World Photography Day 2022: जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या वर्ल्ड फोटोग्राफी डेचा इतिहास जाणून घ्या

आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगले आणि आनंदी क्षण साठवून ठेवण्याची ताकद फोटोंमध्ये असते. असे अनेक महत्चाचे क्षण या फोटोंमध्ये सामावलेले असतात. आपल्या आयुष्यातील अनेक चांगलया क्षणांची आठवण आपण फोटोच्या माध्यमातुन जतन करत असतो. फोटोच्या रूपातील या आठवणी आपण नेहमी सांभाळून ठेवतो. जीवनातील या खास क्षणांची आठवण जपून ठेवणारा दिन म्हणजे जागतिक फोटोग्राफी दिन (World Photography Day 2022)याच निमित्ताने फोटोग्राफीचा इतिहास जाणून घेऊया.

हे ही वाचा – ’10 मुलांना जन्म द्या’, व्लादिमीर पुतिन यांची अजब योजना

जागतिक फोटोग्राफी दिनाचा इतिहास

जागतिक फोटोग्राफी दिनाची सुरुवात 2010 पासून झाली पण असं असलं तरी फोटोग्राफी दिनाचा इतिहास मात्र खूप जुना आहे. फ्रान्समधील जोसेफ नीसफोर निपसे (joseph Nicephore Niepce) आणि लुईस डॅगुएरे (Louis Daguerre) नावाच्या या दोन व्यक्तिंनी ‘डॅगुएरोटाइप’ चा शोध लाऊन पहिल्यांदाच छायाचित्रण प्रक्रिया विकसित केली. त्याचबरोबर फ्रेंच अॅकॅडमी ऑफ सायन्सने 9 जानेवारी 1837 रोजी अधिकृतपणे डॅग्युरिओटाइपचा शोध लावल्याचं जाहीर केलं.

त्या नंतर 10 दिवसांनी फ्रेंच सरकारने आविष्काराचे पेटेंट खरेदी करून स्वतःकडे कॉपी राईट्स न ठेवता जगाला भेट म्ह्णून दिले. 19 ऑगस्ट 1939 रोजी सरकारकडून याची घोषणा केली. म्हणून हा दिवस वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणून जसरा केला जातो. 1839 मध्ये विल्यम हेन्री फॉक्स टालाबॉटने छायाचित्र काढण्याची प्रक्रिया सुलभ केली. तसेच अमेरिकेचे फोटो प्रेमी रॉबर्ट कॉर्नेलियस यांना जगातील पहिले सेल्फी क्लिक करणारे व्यक्ती मानण्यात येते. त्यांनी 1839 मध्ये पहिल्यांदा सेल्फी काढला होता.

हे ही वाचा – डोलो- 650 विक्रीसाठी डॉक्टरांना 1 हजार कोटींचे गिफ्ट्स! सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे

फोटोग्राफर नेहमीच कॅमेराच्या मागे राहून सगळ्यांचे आनंदी क्षण कॅमेरात टिपत असतात. त्याच निमित्ताने जगभरातील फोटोग्राफर्सना प्रोत्साहन देण्यासाठी 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिन(World Photography Day 2022) म्हणून साजरा केला जातो.

हे ही वाचा – मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयचे छापे

First Published on: August 19, 2022 2:06 PM
Exit mobile version