विकीपिडीयावर शरद पवारांची खिल्ली

विकीपिडीयावर शरद पवारांची खिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. ही टीका आता थेट विकीपिडीयावपर येऊन ठेपली आहे. एका अज्ञात व्यक्तीने थेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची खिल्ली उडवली आहे. शरद पवार हे देशातील सर्वात जास्त भ्रष्ट राजकारणी अशी माहिती विकीपिडीयावर टाकण्यात आली होती. ही माहिती बदलण्यात आली आहे. मात्र, राजकारण आता कुठल्या थरावर जावून पोहोचले आहे, हे यातून पहायला मिळत आहे. याअगोदर मोहीते पाटीले यांनी पक्षांतर केल्यानंतर विकीपिडीयावर त्यांच्या पक्षासंदर्भात दरदिवशी पक्ष बदलला जातो, असे नमूद करण्यात आले होते.

याकडे गांभिर्याने बघणे जरुरीचे

शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते. मात्र, आपला नातू पार्थ पवार यांच्यासाठी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. या संदर्भात त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता, घरातील सर्वच जण निवडणुकीसाठी उभे राहीले तर चुकीचा पायंडा पडेल, त्यामुळे आपण माघार घेतली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. निवडणुकीत माघार घेतली असली तरीही शरद पवार यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. ही टीका सोशल मीडियावरुन आता विकीपिडीयावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे याकडे गांभिर्याने बघणे फार जरुरीचे आहे. विशेष म्हणजे जगभरातील लोकं विकीपिडीयावर वाचन करत असतात. त्यामुळे या अशा खोड्या काढल्यामुळे जगातील लोकांपर्यंत शरद पवार यांच्याबाबत चुकीची माहिती जाऊ शकते.

काय आहे विकीपिडीया?

विकीपिडीयावर हे एक माहितीचे स्त्रोत आहे. इतिहासापासून तंत्रज्ञानापर्यंतच्या विविध विषयांसंदर्भातील माहिती या पोर्टलवर मिळत असते. एखाद्या विषयावर अधिकृत माहिती जर कुणाकडे असेल, तर ती व्यक्ती विकीपिडीयावर टाकू शकते. परंतु, त्यासाठी त्या व्यक्तीला या विकीपिडीयाचे लॉग इन आणि आयडी घ्यावे लागते.

First Published on: March 26, 2019 12:34 PM
Exit mobile version