Corona: लस चाचणीसाठी युवकाची देहदानाची इच्छा; पंतप्रधानांना लिहीले पत्र!

Corona: लस चाचणीसाठी युवकाची देहदानाची इच्छा; पंतप्रधानांना लिहीले पत्र!

सध्या कोरोनाचा कहर जगभर असताना सर्वच स्तरांतून कोरोना विरोधातील लढ्यात प्रयत्न करताना दिसताय. कोरोनाची लस शोधण्यासाठी जगभरात अनेक वैज्ञानिक आणि संशोधक आपले प्रयत्न कसे यशस्वी होतील यासाठी जीवापाड मेहनत घेत आहे. कोरोनावरील उपचार म्हणून अनेक देशांनी कोरोना लस तयार केल्याचा दावा देखील केला आहे. मात्र अद्याप या कोरोना लसीकरणाचे परिक्षण पुर्ण झालेले नाही.

दरम्यान, हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील भुरटवाला गावात राहणाऱ्या २७ वर्षीय गणेश चावरिया या तरूणाने वैश्विक साथीच्या रोगावर तयार करण्यात आलेल्या लसीकरणाच्या परिक्षणासाठी आपले शरीर दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात या तरूणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे.

असे लिहीले पंतप्रधान मोदींना पत्र…

कोरोना व्हायरस सारखी महामारी अनेकांचा जीव घेत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या तरी औषधाची तसेच लसीकरणाची नितांत आवश्यकता आहे. विविध देशातील अनेक वैज्ञानिक या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते औषधोपचार तसेच लस तयार करण्यासाठी संशोधन करत आहे.

सुरुवातीला माणसांवर या औषधाची चाचणी करणे अनिवार्य असणार आहे, यासाठी आपले शरीर देण्यासाठी मी तयार आहे. तसेच, या लसीकरण चाचणी दरम्यान मृत्यू झाला तरी कोणतीही अडचण नाही. परंतु देशाला मोठी मदत होईल याचा सर्वाधिक आनंद असेल.

पंतप्रधान मोदींना लिहीलेल्या या पत्राची प्रत या युवकाने केंद्रीय गृहराज्यमंत्री, केंद्रीय आरोग्यमंत्री, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, हरियाणाचे गृह व आरोग्यमंत्री अनिल विज यांना देखील पाठवली आहे.


Corona Live Update: नवी मुंबईत कोरोनाची त्सुनामी; २४ तासात १०५ पॉझिटिव्ह
First Published on: May 11, 2020 11:28 PM
Exit mobile version