घरCORONA UPDATECorona Live Update: नवी मुंबईत कोरोनाची त्सुनामी; २४ तासात १०५ पॉझिटिव्ह

Corona Live Update: नवी मुंबईत कोरोनाची त्सुनामी; २४ तासात १०५ पॉझिटिव्ह

Subscribe

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाची त्सुनामी लाट आली. अवघ्या २४ तासात नवी मुंबईत १०५ कोरोनाचे नवीन रुग्ण वाढले आहेत. नवी मुंबईत एकूण रुग्णांची संख्या आता ७७९ झाली आहे. आज आणखी १४ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १६९ आहे. तर आतापर्यंत नवी मुंबईत कोरोनामुळे १८ जण मृत पावले आहेत.


दि. १२ मे पासून दिल्लीला जोडणाऱ्या १५ शहरांमधून ३० रेल्वे सुटणार आहेत. या रेल्वेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. त्यानंतर देशात काय परिस्थिती असेल? यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा करत आहेत.


दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन १६ मे रोजी ट्रेन महाराष्ट्रासाठी निघणार आहे. या ट्रेनमध्ये सुमारे १६०० विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणलं जाणार आहे. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी हे विद्यार्थी दिल्लीमध्ये होते.


श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये आता प्रवासी संख्या वाढवण्यात आली असून १२०० ऐवजी १७०० मजुरांना नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच या ट्रेनला ३ ठिकाणी थांबे देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.


११८ भारतीयांना घेऊन अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्कोहून निघालेलं एअर इंडियाचं विमान आज हैदराबाद विमानतळावर उतरलं आहे.


राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून कालच्या एका दिवसात राज्यात १ हजार २७८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. शिवाय ५३ रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात एकाच दिवशी मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा हा आजपर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.

वाचा सविस्तर


औरंगाबादमध्ये कोरोनाने आता वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. काल एका रात्रीत औरंगाबादमध्ये ५८ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. शिवाय, आत्तापर्यंत औरंगाबादमध्ये कोरोनामुळे १४ जणांचा बळी गेला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांसोबतची ही पंतप्रधानांची पाचवी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चर्चा होणार असून देशातल्या लॉकडाऊनसंदर्भात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

वाचा सविस्तर


देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून बंद असलेली रेल्वेची चाकं आता अखेर फिरणार आहेत. देशातल्या काही ठिकाणांहून या पॅसेंजर ट्रेन सोडण्यात येणार असून त्यासाठी आज संध्याकाळी ४ वाजेपासून बुकिंग सुरू होणार आहे. या ट्रेन उद्या म्हणजेत १२ मेपासून सुरू होणार आहेत.

वाचा सविस्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -