‘सेक्रेड गेम्स’ फेम झोयाच्या घरात अज्ञाताने घुसण्याचा केला प्रयत्न, करत होता गर्लफ्रेंड असल्याचा दावा

‘सेक्रेड गेम्स’ फेम झोयाच्या घरात अज्ञाताने घुसण्याचा केला प्रयत्न, करत होता गर्लफ्रेंड असल्याचा दावा

'सेक्रेड गेम्स' फेम झोयाच्या घरात अज्ञाताने घुसण्याचा केला प्रयत्न, करत होता गर्लफ्रेंड असल्याचा दावा

बहुचर्चित वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री एल्नाज नौरोजीच्या घरामध्ये एक व्यक्ती घुसण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर एल्नाजने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अभिनेत्री एल्नाज नौरोजीने वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये प्रमुख भूमिका निभावली आहे. याशिवाय काही वेबसीरिज आणि चित्रपटात काम केले आहे.

अलीकडेच ती गोव्यात एका मित्राच्या घरी थांबली होती. यादरम्यान एका व्यक्तीने तिच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. एल्नाज गोवामध्ये आहे आणि ती सतत शूटिंग करत आहे. त्यामुळे एल्नाजने मित्रांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी एक व्यक्ती तिच्या सुरक्षारक्षकाला चकमा देऊन जबरदस्तीने घरात घुसला.


हेही वाचा – महाराष्ट्राचे भावजी आदेश बांदेकरांच्या मुलाचे अभिनयात पदार्पण


 

First Published on: February 24, 2021 10:11 PM
Exit mobile version