Video: सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी संभावना सेठचा पती आणि पोलिसांत बाचाबाची

Video: सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी संभावना सेठचा पती आणि पोलिसांत बाचाबाची

Video: सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी संभावना सेठचा पती आणि पोलिसांत बाचाबाची

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आज, शुक्रवारी पंचतत्वात विलीन झाला. सिद्धार्थला शेवटचा निरोप (Sidharth Shukla funeral) देण्यासाठी कुटुंबासह अनेक कलाकार मुंबईतील ओशिवरामध्ये पोहोचले होते. येथे सिद्धार्थवर ब्रह्मकुमारी विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याची घटना समोर आली असून सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सिद्धार्थला शेवटाचा निरोप देण्यासाठी पोहोचलेली भोजपुरी स्टार संभावना सेठचा (Sambhavna Seth) पती अविनाश द्विवेदी (Avinash Dwived) आणि मुंबई पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. (A scuffle broke out between Sambhavna Seth husband and police)

असे काय घडले? 

या घटनेचे बरेच व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये पोलीस आणि अविनाशमध्ये बाचाबाची झालेली दिसत आहे. यादरम्यान संभावना सेठ रागाच्या भरात पोलिसांवर ओरडताना दिसत आहे. ही संपूर्ण घटना काय आहे, हे समोर आले नाही आहे. परंतु माहितीनुसार, संभावना सेठ पती अविनाशसोबत ओशिवरा स्मशानात पोहोचली होती. दुःखत प्रसंग असल्यामुळे सर्वजण पांढऱ्या कपड्यांमध्ये तिथे पोहोचले होते. मात्र संभावनाचा पती पांढऱ्या कपड्याऐवजी वेगळ्यारंगाच्या कपड्यामध्ये आला होता. लोकांच्या गर्दी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला होता. अशातच संभावनाचा पती आतमध्ये जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी गर्दी असल्यामुळे अविनाशला थांबवले.

संभावना भडकली पोलिसांवर

अविनाशच्या वेगळ्या रंगाचे कपडे आणि हातत मोबाईल पाहून पोलिसांना वाटले तो माध्यमातील व्यक्ती आहे. त्यामुळे अविनाश आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर धक्काबुक्की झाली. यामुळे संभावना भडकली. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ते म्हणत आहेत की, एका पोलीस कर्मचाऱ्याने अविनाशला मारले. पण यादरम्यान एक व्यक्तीमधे आला आणि त्याने संभावनाला हात जोडून शांत राहायला सांगितले आणि सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारला जाण्यास सांगितले.


हेही वाचा – Sidharth Shukla death-सिद्धार्थच्या मृत्यूचं गूढ वाढलं,पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट


 

First Published on: September 3, 2021 5:47 PM
Exit mobile version