आमीर खानला महाभारतावर आधारित चित्रपट तयार करण्याची इच्छा; परंतु म्हणाला मी त्याला घाबरतो

आमीर खानला महाभारतावर आधारित चित्रपट तयार करण्याची इच्छा; परंतु म्हणाला मी त्याला घाबरतो

बॉलिवूड अभिनेता आमीर खान सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमीरचा हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. 11 ऑगस्ट रोजी ‘लाल सिंह चड्ढा’ प्रदर्शित होणार असून सध्या आमिर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचं दरम्यान, आमीरने त्याच्या ड्रीम प्रोजेक्टबाबत खुलासा केला आहे. या ड्रीम प्रोजेक्टचं नाव अद्याप समोर आलं नसलं तरी या चित्रपट महाभारताच्या कथेवर आधारित असणार आहे.

आमीरला महाभारत चित्रपट बनवण्याची वाटते भीती
आमीर खानने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला महाभारत बनवण्याची भीती वाटते. कारण, महाभारत चित्रपटपेक्षा पण मोठं आहे. हा महाभारत नसून एक यज्ञ आहे. जी तुम्हाला कधीही हताश करणार नाही. परंतु, तुम्ही त्याला हताश करू शकता. आमिर खानने याआधी सुद्धा एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते की, महाभारत त्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याला मी पूर्ण करू इच्छितो. परंतु हे माझं स्वप्न आहे. जे पूर्ण करण्यासाठी मला २० वर्ष लागतील. कमीत कमी पाच वर्ष याचा अभ्यास करण्यासाठी लागतील. त्यामुळे मी त्याला घाबरतो.

‘लाल सिंह चड्ढा’ तयार करण्यासाठी लागले 14 वर्ष
आमीर खानने नुकताच या गोष्टीचा खुलासा केला की, लाल सिंह चड्ढा चित्रपटाचे हक्क मिळवण्यासाठीच 8 ते 9 वर्ष लागले आणि सगळे मिळून एकूण या चित्रपटाला 14 वर्ष लागले.

11 ऑगस्ट रोजी ‘रक्षाबंधन’ आणि ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये होणार चढाओढ
गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये हे दोन्ही चित्रपट चर्चेत आहेत. 2022 मध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक फारशी गर्दी करत नाहीत. अशातच आता दोन्ही चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल हे पाहण्यासारखे आहे. मागील काही दिवसांपासून या दोन्ही चित्रपटांवर सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.


हेही वाचा :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २२ व्या भारत नाट्य महोत्सवाचे उद्‌घाटन

First Published on: August 10, 2022 1:28 PM
Exit mobile version