Go Air च्या उद्धट एयर होस्टेसवर संतापली अभिनेत्री चित्रांगदा, म्हणाली यांना थोडा शिष्टाचार शिकवा

Go Air च्या उद्धट एयर होस्टेसवर  संतापली अभिनेत्री चित्रांगदा, म्हणाली यांना थोडा शिष्टाचार शिकवा

Go Air च्या उद्धट एयर होस्टेसवर संतापली अभिनेत्री चित्रांगदा, म्हणाली यांना थोडा शिष्टाचार शिकवा

Chitrangada Singh Slams Go Air :  नुकत्याच येऊन गेलेल्या बॉस बिस्वास सिनेमातील अभिनेत्री चित्रांगदा सिंग सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. चित्रांगदाने यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत गो एअर या एअरलाइन विरोधात तीव्र संपात व्यक्त केला आहे. एअर होस्टेसचे वर्तन अत्यंत असभ्य आहे. यांना थोडा शिष्टाचार शिकवा, अशा शब्दात चित्रांगदाने एअर होस्टेसच्या वागणूकीवर संपात व्यक्त केला आहे.

चित्रांगदा गो एअरच्या दिल्ली-मुंबई फ्लाइट ३९१ ने प्रवास करत असताना तिला फार वाईट अनुभव आला. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घडलेला प्रकार सांगितला. ती म्हणाली गो एअरच्या दिल्ली मुंबई फ्लाइट ३९१मध्ये आतापर्यंतची सर्वात वाईट आणि उद्धट एअर होस्टेस आहे. तिला कोणीतरी शिष्टाचार शिकवा.

घटना माझ्यासोबत घडली नाही तर माझ्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीसोबत घडली. त्या एअर होस्टेसने त्या व्यक्तीला फार वाईट वागणूक दिली. तो व्यक्ती तरीही तिच्याशी नम्रतेने वागत होता. तिच्याइतकी अहंकारी एअर होस्टेस मी आतापर्यंत पाहिली नाही. क्रुमध्ये असलेल्या लोकांनी प्रवाशांसोबत अशाप्रकारे रागाने बोलू नये, असे चित्रांगदा म्हणाली.

हा प्रकार आज गो एअरमध्येच झाला नाही तर काही दिवसांपूर्वी अभिनेता आर्य बब्बर सोबतही असाच प्रकार घडला होता. अभिनेता आर्य बब्बरने देखील गो फर्स्ट फ्लाइटने प्रवास करताना वैमानिकासोबत त्याचा वाद झाला होता. तेव्हा त्याने देखील एक व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली होती.

अभिनेत्री चित्रांगदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी ती दररोज शेअर करत असते. ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’ या सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. अलिकडेच ती बॉस बिस्वास सिनेमात दिसली होती. त्याचप्रमाणे तिने ‘ये साली जिंदगी’, ‘देसी बॉईज’, ‘इनकार’, ‘आय मी ओर मैं’, ‘बाजार’ यासारख्या सिनेमातही काम केले आहे.


हेही वाचा –   फिल्ममेकर नागराज मंजुळेंचे हिरे ‘झुंड’ चित्रपटात एकत्र

First Published on: February 24, 2022 8:10 AM
Exit mobile version