कंगनाची ‘तेजस’ भरारी, डिसेंबरमध्ये होणार उड्डाण!

कंगनाची ‘तेजस’ भरारी, डिसेंबरमध्ये होणार उड्डाण!

कंगना रणावत

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणावतचा आगामी चित्रपट ‘तेजस’ चा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कंगना भारतीय वायूदलातील पायलटची भूमिका साकारणार आहे. सर्वेश मेवारा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. विकी कौशलच्या प्रसिद्ध उरी-द सर्जिकल स्ट्रइक या चित्रपटाचे निर्माते कंगनाच्या तेजसची निर्मिती करत आहेत.

तेजस या चित्रपटात कंगना एअर फोर्स पायलटची भूमिका साकारणार आहे. देशाच्या साहसी एअरफोर्स पायलटची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार असून मी या चित्रपटाचा एक भाग आहे याचा मला अभिमान आहे’, असं म्हणत कंगनाने म्हटलं आहे. कंगनानेच फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. येत्या डिसेंबर महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

पंगा’च्या प्रमोशनवेळी कंगनाने ‘तेजस’ चित्रपटाबाबत सांगितले होते. यावेळी तीने बालपणापासूनची एअरफोर्समध्ये काम करण्याची इच्छा होती असं सांगितलं होतं. कंगनाने या चित्रपटासाठी विशेष ट्रेनिंग देखील घेतलं आहे. प्रोफेशनल ट्रेनरच्या हाताखाली कंगनाने एअरफोर्स पायलटच्या भूमिकेचे धडे गिरवले आहेत. ‘तेजस’च्या फर्स्ट लूकनंतर आता ट्रेलरची प्रतीक्षा आहे.

कंगना रणावत सध्या सुशांत सिंग राजपूत संदर्भात बोलताना पुढे येत आहे. मानसिक आरोग्य, नेपोटिज्म वाद या विषयांवर तिने आपले मत मोकळेपणाने मांडले आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कंगना अखेर जस्सी गिलसह पंगा या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती थलाइवी आणि धाकड या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

First Published on: August 28, 2020 4:23 PM
Exit mobile version