अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मागवला ‘हेडफोन’ मिळाला ‘नट बोल्ट’

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मागवला ‘हेडफोन’ मिळाला ‘नट बोल्ट’

नूर या सिनेमातील सोनाक्षी सिन्हाचा लूक

ऑनलाईन शॉपिंगमध्ये आतापर्यंत अनेकांची फसवणूक झाली आहे. अशा प्रकारची फसवणूक सेलिब्रिटींनाही काही चुकलेली नाही . सध्या सोनाक्षी सिन्हाला ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक फसवणूक झाल्याचा अनुभव आला आहे. तिने एका शॉपिंग वेबसाईटवरुन हेडफोन्स मागवले. पण प्रत्यक्षात ऑर्डर आल्यानंतर  तिने बॉक्स उघडला आणि तिला त्यात ब्रँड न्यू हेडफोन नाही तर मिळाला एक नटबोल्ट!  मग काय क्षणाचाही विलंब न लावता सोनाक्षीने  ट्विट करत झालेला सगळा प्रकार सांगितला आहे.

कोणी केली सोनाक्षीची फसवणूक ?

सोनाक्षीन अमेझॉन या वेबसाईटवरुन बॉश या कंपनीचे हेडफोन्स मागवले होते. इतरांप्रमाणे जेव्हा तिने मागावलेले हेडफोन्स घरी आल्यानंतर उघडून पाहिले तर तिला त्यात गंजलेला नटबोल्ट दिसला. ही बाब अमेझॉनच्या लक्षात आणून देण्यासाठी तिने त्यांना टॅग करुन झालेला सगळा प्रकार सांगितला आहे. तिने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बॉश कंपनीचा पूर्णत: सील असलेला बॉक्सच माझ्याकडे आला. पण त्यात हेडफोन्स नाही तर हे मिळाले आहे. तक्रार करण्यासाठी कस्टमर केअरला फोन लावला. पण त्यांना माझी मदत करायची नाही.

वाचा- स्वाईप मशीनचा वापर करुन फसवणूक करणारी टोळी गजाआड

दुसऱ्या ट्विटमध्ये सोनाक्षीचा अमेझॉनवर  वार

सोनाक्षीने लागलीच दुसरे ट्विट करत तिला मिळालेली वस्तू १८ हजार रुपयाला विकत आहे, असे सांगितले. पण मी ही वस्तू नक्कीच अमेझॉनवर विकणार नाही. कारण तरच तुम्हाला तुम्ही मागवलेली वस्तू मिळेल, अशा शब्दात टीका केली आहे.

हे माहीत आहे का? – तब्बल २२ कोटींची फसवणूक करणाऱ्याला एक वर्षानंतर अटक

नेटीझन्सची टिवटिवाट

सोनाक्षीच्या या ट्विटवर तिच्या चाहत्यांनी, ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालेल्यांनी त्यांची मते मांडली आहेत. काहींनी तर सोनाक्षीच्या या ट्विटची तिच्या करिअरशी तुलना केली आहे. त्यामुळे आता सोनाक्षीला अमेझॉन कशी मदत करते हे पाहावं लागेल.

First Published on: December 13, 2018 9:03 AM
Exit mobile version