Kiran Mane: अभिनेते किरण मानेंच्या पत्नीची महिला आयोगाकडे धाव, रुपाली चाकणकरांनी स्टार प्रवाहकडे मागितले स्पष्टीकरण

Kiran Mane: अभिनेते किरण मानेंच्या पत्नीची महिला आयोगाकडे धाव, रुपाली चाकणकरांनी स्टार प्रवाहकडे मागितले स्पष्टीकरण

Kiran Mane: अभिनेते किरण मानेंच्या पत्नीची महिला आयोगाकडे धाव, रुपाली चाकणकरांनी स्टार प्रवाहकडे मागितले स्पष्टीकरण

अभिनेते किरण माने (Kiran Mane)  यांना मुलगी झाली हो (Mulgi jhali ho )  या मालिकेतून काढल्याने सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणाने आता एक वळण घेतले असून अभिनेते किरण मानेंच्या पत्नी ललिता माने (Lalita Mane )  यांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. पती किरण मानेंच्याबाबत घडलेल्या प्रकाराची त्यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली असून त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (state womens commissioner Rupali Chakankar)  यांनी स्टार प्रवाहकडे किरण मानेंना का काढले याचे सविस्तर स्पष्टीकरण मागितले आहे. मानेंना मालिकेतून का काढले याचा जाब रुपाली चाकणकर यांनी स्टार प्रवाह वाहिनीला विचारला आहे. यासंबंधी एक पत्र त्यांनी वाहिनीला पाठवले आहे.

मुलगी झाली हो या मालिकेच्या पॅनोरामा इंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेच्या पदाधिकारी सुझान घई यांना रुपाली चाकणकर यांनी पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, किरण माने आणि त्यांच्या पत्नी ललिता माने यांना झालेल्या प्रकाराचा मानसिक त्रास होत असून त्यांना आर्थिक अडचणींचा देखील सामना करावा लागल आहे. या सगळ्याची दखल घेऊन निर्मिती संस्थेने किरण माने यांना मुलगी झाली हो या मालिकेतून का काढले स्पष्टीकरण द्यावे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता विविध माध्यमांवर आपले वैचारिक भूमिका मांडताता या कारणामुळे त्यांना मालिकेतून काढले असून मालिकेच्या निर्मात्यांच्या या कृतीमुळे प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

रुपाली चाकणकर पुढे असे म्हणाल्यात की, कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला करणारी असल्याने याबाबत लेखी खुलासा करावा मालिकेच्या निर्मात्यांनी राज्य महिला आयोगाकडे सादर करावा असे निर्देश देण्यात आहेत.

किरण माने यांना काही व्यावसायिक कारणांमुळे मालिकेतून काढण्यात असे स्पष्टीकरण पॅनरामा इंटरटेनमेंटकडून देण्यात आले. मात्र त्यानंतर किरण मानेंच्या गैरवर्तणूकीमुळे एक महिलेने त्यांच्याविषयी तक्रार केली. त्याच्या गैरवर्तणूकीमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले असे सांगण्यात आले. मालिकेतील सर्व कलाकारांना विचारले असता त्यातील काही कलाकार किरण मानेंच्या विरोधात बोलले तर काही कलाकारांनी किरण मानेंना पाठींबा दिला. यावरुन मालिकेतील कलाकरांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले.


हेही वाचा – Kiran Mane: आरोप करणाऱ्या महिला कलाकाराचे पती भाजपचे पदाधिकारी, अभिनेते किरण मानेंचा दावा

First Published on: January 18, 2022 8:05 AM
Exit mobile version