‘मैदान’ चित्रपटातून अजय देवगण साकारणार सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका

‘मैदान’ चित्रपटातून अजय देवगण साकारणार सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट काल (गुरुवारी) रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजयसोबत तब्बूही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच गुरुवारी अजय देवगणच्या ‘मैदान’ या आगामी चित्रपटाचं टीझर जाहिर करण्यात आलं. त्यामुळे अजयच्या चाहत्यांसाठी भोलानंतर आणखी एक चित्रपट पाहयला मिळणार आहे.

मैदानाचा टीझर रिलीज

बहुप्रतिक्षित ‘मैदान’ या चित्रपटाच्या टीझरला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 1 मिनिट 30 सेकंदाच्या टीझरमध्ये अजय देवगणने संपूर्ण फुटबॉलचे मैदान पाण्याने भरले आहे. यात फुटबॉल खेळाडू उत्तम फुटबॉल खेळताना दिसत आहेत. टीझरच्या शेवटच्या दृश्यात, अजय “आज मैदानात उतरनं 11, पण दिसणं 1”, असा दमदार संवाद बोलतो.

सत्यघटनेवर आधारित चित्रपट

अजय देवगण, प्रियामणी, गजराव राव यांचा हा चित्रपट 23 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार असून हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीमच्या भूमिकेत दिसणार आहे.  हा चित्रपट भारतीय फुटबॉलच्या गोल्डन एरा (1952-1962) वर आधारित आहे. अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ज्येष्ठ संगीतकार ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे.

कोण होते सय्यद अब्दुल रहीम?

सय्यद अब्दुल रहीम यांना रहीम साहब असेही म्हटले जात होते. ते एक व्यावसायिक फुटबॉलपटू होते. पुढे ते भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघाने 1962 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. इतकेच नाही तर भारत मेलबर्न ऑलिम्पिक (1956) च्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. सय्यद अब्दुल रहीम हे देखील चांगले प्रेरक होते. जोपर्यंत ते फुटबॉल संघाचे प्रशिक्षक होते, तोपर्यंत त्याला सुवर्णकाळ म्हटले जात होते.


हेही वाचा :

अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

First Published on: March 31, 2023 10:17 AM
Exit mobile version