एका चित्रपटामागे अक्षय घेतो 160 कोटी; अनेक घरांसह परदेशातील एका डोंगराचा मालक

एका चित्रपटामागे अक्षय घेतो 160 कोटी; अनेक घरांसह परदेशातील एका डोंगराचा मालक

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं खर नाव राजीव हरी ओम भाटिया असे आहे. अक्षय सध्या 55 वर्षाचा असून त्याचा जन्म पंजाबच्या अमृतसर मधील एका पंजाबी कुटुंबामध्ये झाला होता. अक्षयचे शिक्षण मुंबईमध्ये झालं. 1991 साली अक्षयने सौगंध या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर लागोपाठ त्याचे अनेक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. सध्या अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो त्याच्या एका चित्रपटामागे 160 कोटी मानधन घेतो.

अक्षयचा जुहूतील आलिशान बंगला

अक्षयचे राहते घर मुंबईतील जुहू येथे आहे. हे संपूर्ण घर भव्य आणि आलिशान असून या घराची डिझाईन अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने केली आहे. या घराव्यतिरिक्त मुंबईतील खार येथे 7.8 कोटी रुपयांची आलिशान अपार्टमेंट आहे. तसेच त्याचे मुंबईत आणखी चार फ्लॅट आहेत.

गोवा आणि मॉरिशसमध्येही आलिशान बंगले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षयचा मॉरिशसमधील बीचजवळ एक भव्य बंगला आहे, जिथे तो अनेकदा आपल्या कुटुंबासह सुट्टी घालवतो. याशिवाय अक्षयचा गोव्यात एक व्हिला आहे, ज्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे.

अक्षय कुमार कॅनडातील टोरंटो येथे डोंगर आणि घराचा मालक

अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. कदाचित याच कारणासाठी त्याने कॅनडामध्येही गुंतवणूक केली असावी. अक्षयने मॅपल लीफमध्ये एक आलिशान बंगला आणि काही अपार्टमेंट्स आणि टोरंटोमध्ये संपूर्ण डोंगर खरेदी केला आहे.

2008 सुरु केले स्वतःचा प्रोडक्शन हाऊस

2008 मध्ये अक्षयने वडिलांच्या नावाने ‘हरिओम प्रॉडक्शन’ सुरू केले, ज्याचे नाव आता ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ असे ठेवण्यात आले आहे. सिंग इज किंग, हॉलिडे, एअरलिफ्ट, रुस्तम आणि पॅडमॅन यासारखे काही ब्लॉकबस्टर चित्रपट या प्रॉडक्शन हाऊसने तयार केले आहेत.

अक्षय कुमार लवकरच त्याचा फॅशन ब्रँड ‘फोर्स IX’ लॉन्च करणार आहे
नुकत्याच काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्याचा फॅशन ब्रँड फोर्स नाईन (‘फोर्स IX’) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.


हेही वाचा :

बॉक्स ऑफिसवर फक्त ‘दृश्यम 2’ चा जलवा; काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाला फटका

First Published on: December 11, 2022 2:33 PM
Exit mobile version