घरमनोरंजनबॉक्स ऑफिसवर फक्त 'दृश्यम 2' चा जलवा; काजोलच्या 'सलाम वेंकी' चित्रपटाला फटका

बॉक्स ऑफिसवर फक्त ‘दृश्यम 2’ चा जलवा; काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाला फटका

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि विशाल जेठवा यांचा ‘सलाम वेंकी’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला.मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत होता. या चित्रपटामध्ये आई आणि मुलाची सुंदर भावनिक गोष्ट दाखवण्यात आली आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाल्यानंतरही या चित्रपटाने फारशी कमाई केलेली नाही. हा चित्रपट भारतामध्ये जवळपास 1200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

‘सलाम वेंकी’ चित्रपटाची कमाई
काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जवळपास 60 लाख कमावले तर दुसऱ्या दिवशी 95 लाख कमावले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट 30 कोटी रुपये आहे.

- Advertisement -

सलाम वेंकीची गोष्ट

- Advertisement -

‘सलाम वेंकी’ चित्रपटाची कथा तरुण बुद्धिबळपटू कोलावेन्नू व्यंकटेशच्या सत्यकथेवरून प्रेरित असून, त्यात आई-मुलाच्या जीवनातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. चित्रपटात वेंकीची भूमिका अभिनेता विशाल जेठवाने साकारली आहे, तर काजोल त्याची आई झाली आहे.

‘सलाम वेंकी’मध्ये आमिर खान देखील दिसणार
या चित्रपटामध्ये काजोल, विशाल जेठवा यांच्या व्यतिरिक्त राहुल बोस, राजीव खंडेलवाल, अहाना कुमरा आणि प्रकाश राज देखील महत्वाच्या भूमिकेत दिसतील. तसेच चित्रपटात थोड्या वेळासाठी अमीर खान देखील दिसणार आहे.

बॉक्स ऑफिसवर फक्त ‘दृश्यम 2’ चा जलवा
अजय देवगणचा चित्रपट ‘दृश्यम 2’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 23 दिवस झाले असून या  चित्रपटाने आपली पकड मजबूत ठेवली आहे.  चित्रपटाने 23 व्या दिवशी 4.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची एकूण कमाई 203.57 कोटींवर गेली आहे. या चित्रपटामुळे ‘भेडिया’, ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’नंतर आता काजोलच्या ‘सलाम वेंकी’ला देखील त्याचा फटका बसत आहे.


हेही वाचा :

आमचं कोकणही ‘समृद्धी’ची वाट बघतंय… अभिजीत केळकरची संतप्त पोस्ट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -