‘या’ व्यक्तीशी आलिया-रणबीरच्या बाळाच्या नावाचे कनेक्शन

‘या’ व्यक्तीशी आलिया-रणबीरच्या बाळाच्या नावाचे कनेक्शन

बॉलिवूड मधील ग्लॅमरस कपल म्हणून आलिया आणि रणबीरला ओळखले जाते. आलियाने काहीच दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलीया आणि रणबीर (alia bhatt and ranbir kapoor) या दोघांच्याही चेहऱ्यावर आई – बाबा झाल्याचा आनंद दिसत आहे. बॉलिवूड मधील कलाकार त्यांच्या मुलांची युनिक नावं ठेवत असतात. अशातच आलीया आणि रणबीर त्यांच्या मुलीचे नाव काय ठेवणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आलीया आणि रणबीर यांनी त्यांच्या बाळाचे नाव ठरविले आहे, अश्या चर्चा सुरु आहेत. आलिया आणि रणबीरच्या मुलीच्या नावाचे कपूर परिवारासोबत एक खास कनेक्शन आहे.

बाळाचे नाव ठरविले
आलीया आणि रणबीर (alia bhatt and ranbir kapoor) यांच्या मुलीला पाहण्यासाठी आणि तिचे नाव काय असेल हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. एका रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की आलिया आणि रणबीरने त्यांच्या मुलीचे नाव फायनल केले असल्याचे समजते आहे आणि ते नाव काय असणार आहे हे लवकरच चाहत्यांना सांगण्यात येणार आहे. दरम्यान रणबीरच्या मुलीच्या नावाचे कनेक्शन हे दिवंगत अभिनेते आणि रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्या नावाशी आहे.

 नीतू कपूर झाल्या भावूक
आलिया आणि रणबीर (alia bhatt and ranbir kapoor) यांच्या मुलीच्या नावाचे कनेक्शन हे ऋषी कपूर यांच्या नावाशी आहे हे समजल्यावर नीतू कपूर (neetu kapoor) सुद्धा भावूक झाल्या आहेत. आजी झाल्यामुळे नीतू कपूरसुद्धा खूप खुश आहेत.


हे ही वाचा – करिअरच्या सुरुवातीलाच निर्मात्यांनी माझ्या अंगावर कुत्रे सोडले; रणवीर सिंगने सांगितला कटू अनुभव

First Published on: November 16, 2022 3:56 PM
Exit mobile version