अनन्या पांडेने शाहरुखच्या लेकीला चित्रपटांविषयी ‘हा’ सल्ला दिला

अनन्या पांडेने शाहरुखच्या लेकीला चित्रपटांविषयी ‘हा’ सल्ला दिला

अभिनेत्री अनन्या पांडे सोबत सुहाना खान

चित्रपट अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे आणि शाहरूख खानची मुलगी सुहाना खान या लहानपणीच्या मैत्रिणी आहेत. पती, पत्नी और वो या चित्रपटातून अनन्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनन्याने आतापर्यंत दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान सुहाना खानने ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान अनन्याला सुहानाच्या छोट्या चित्रपटातील अभिनयाविषयी विचारण्यात आले. यावेळी अनन्या म्हणाली होती की, “हा. मी तिचा चित्रपट पाहिला. सुहाना ही एक उत्तम अभिनेत्री आहे. शाळेमध्ये आम्ही एकत्र नाटकात काम करत असू. न्यूयॉर्क फिल्म अॅकेडमीमध्ये आम्ही एकत्र कोर्स पूर्ण केला आहे. मला वाटते की सुहाना खूप टॅलेंन्टेड आहे.”

अनन्या पुढे म्हणाली की, “मी सुहानासाठी निर्णय घेऊ शकत नाही. पण सुहाना खरच खूप टॅलेन्टेड आहे. मला वाटते की ती एक उत्तम न्यृत्यांगना, गायिका आणि अभिनेत्री आहे. मला वाटते की संजय लीला भंसाळी सरांच्या चित्रपटात सुहाना सुंदर दिसेल. अनन्या पांडेने तिची चांगली मैत्रिण सुहाना खानला शुभेच्छा सुद्धा दिल्या. स्टुडण्ट ऑफ ईयर २ मध्ये अनन्या दिसली होती. त्याशिवाय पती, पत्नी और वो या चित्रपटातसुद्धा अनन्या दिसणार आहे.

हेही वाचा – ‘बंटी और बबली २’मध्ये राणी दिसणार ‘या’ अभिनेत्यासह

First Published on: December 19, 2019 8:06 PM
Exit mobile version