घरमनोरंजन'बंटी और बबली २'मध्ये राणी दिसणार 'या' अभिनेत्यासह

‘बंटी और बबली २’मध्ये राणी दिसणार ‘या’ अभिनेत्यासह

Subscribe

बंटी और बबली या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येणार असे काही दिवसांपूर्वी कळण्यात आले होते. तर या चित्रपटात राणी मुखर्जी आणि सैफ अली खान हे दोघे देखील दिसणार आहेत.

तब्बल १४ वर्षांनंतर बंटी और बबली या २००५ च्या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे बंटी और बबली २ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या दुसरा भागात, गल्ली बॉयचा एमसी शेर म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी आणि बॉलिवुडमध्ये प्रथमच पदार्पण करणारी अभिनेत्री शर्वरी हे दोघे दिसणार आहेत. यशराज फिल्म्सच्या इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ आणि शर्वरीचा फोटो अपलोड करून यशराज फिल्म्सने या चित्रपटाची घोषणा केली होती. तर आज पुन्हा एकदा यशराज फिल्म्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटासंर्दभात आणखी एक पोस्ट अपलोड केला आहे. या पोस्टमधून हे कळण्यात येते की चित्रपटातली ओरिजिनल बबली म्हणजे राणी मुर्खजी ही पुन्हा एकदा प्रेक्षकांनच्या भेटीस येणार आहे. मात्र यावेळेस चित्रपटात बबलीच्या बंटीची भूमिका ही सैफ अली खान सादर करणार आहे.

- Advertisement -

अभिषेकची जागा सौफने घेतली?

चित्रपटाच्या पहिला भागात बंटीची भूमिका ही अभिषेक बच्चने सादर केली होती मात्र दुसऱ्या भागात ही भूमिका सैफ सादर करणार आहे. या मागचे कारण असे की चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्याची चर्चा सुरू असताना राणी आणि अभिषेक दोघांनाही त्यांच्या ओरिजिनल भूमिकेंसाठी विचारले गेले होते. मात्र काही कारणास्तव अभिषेकला हा चित्रपट करणे जमणार नव्हते म्हणून सैफची निवड करण्यात आली. एक वृत्तवाहीनीशी बोलताना राणी म्हणाली. सैफ आणि राणीची जोडी ही प्रेक्षकांना अनेकदा पाहता आली आहे आणि त्यांच्या जोडीचे प्रेक्षकांनी फार कौतुक देखील केले आहे. ‘हम तुम’, ‘तारा रम पम’, ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ या चित्रपटांमध्ये राणी आणि सैफची जोडी दिसली होती आणि ११ वर्षांनतर पुन्हा एकदा त्यांना एकत्र पाहता येणार आहे.

बंटी और बबलीच्या पहिला भागाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतीसाद दिला होता. या चित्रपटातली गाणी देखील चांगलीच गाजली होती. या चित्रपटात राणी आणि अभिषेकसह अमिताभ बच्चन देखील होते. ऐश्वर्या राय बच्चन ही देखील एका आयटम सॉंगमध्ये दिसली होती.


हेही वाचा: ‘माझं मराठी असणं मला जास्त स्टायलिश वाटतं’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -