अंकिता लोखंडे आणि विकी जैनचे प्री-वेडिंग फोटोशूट वायरल ; पाहा अंकिताचा मराठमोळा साज

अंकिता लोखंडे आणि विकी जैनचे प्री-वेडिंग फोटोशूट वायरल ; पाहा अंकिताचा मराठमोळा साज

पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा प्रियकर विकी जैन १४ डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र, अंकिताने एक फोटो पोस्ट सोशल मिडियावर शेअर करत चाहत्यांना संभ्रमात टाकले आहे. या फोटोमध्ये अंकिता आणि विकीचा आऊटफिट हा वधू-वरांसारखा दिसत आहे. त्यामुळे दोघांनी ठरलेल्या मुहूर्ताच्या अगोदरच लग्न उरकलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

 

सोशल मिडियावर अंकिता आणि विकीची पोस्ट मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.यामध्ये अंकिताचा मराठमोळा साज पाहायला मिळतं आहे. अंकिताने पोपटी रंगाची साडी परिधान केली असून, हातात हिरवा चुडा,नाकात नथ आणि कपाळावरती मुंडावळ्या असा, वधूसारखा मराठमोळा साज तिच्यावर शोभून दिसतो आहे. याशिवाय विकीनेसुद्धा सदरा परिधान केला असून, कपाळावर मुंडावळ्या बांधलं आहे.अंकिताने हा फोटो स्वत:च्या इंस्टाग्रामच्या ऑफिशिअल अकाउंटवर  शेअर केला असून, ‘पवित्र’ असे कॅप्शन दिले आहे. मात्र हा फोटो लग्नाचा नसून, अंकिता आणि विकीने मराठमोळा साज परिधान करुन प्री-वेडिंग फोटोशूट केलं आहे.या पोस्टवर कमेंट करत अंकिताचे अनेक चाहते तिला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित अंकिताचे मित्रही या पोस्टवर कमेंट करून दोघांचे अभिनंदन करत आहेत.

याशिवाय, अंकिताने लग्नाचा विधी करताना फोटोशूट केलेला फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून, त्या फोटोला ‘अधीर मन झाले’ हे गाणे लावले आहे.याशिवाय विकीनेसुद्धा त्याच्या अकाउंटवर फोटो शेअर करत,”मी आमच्यावर प्रेम करतो”BUT”पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त..”, असे कॅप्शन दिले आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, विक्की जैन आणि अंकिता लोखंडे १४ डिसेंबर लग्न करणार आहेत. मित्र मंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अंकिता आणि विक्कीचा शानदार विवाह सोहळा पार पडणार आहे. १२ डिसेंबरला अंकिताचा मेहंदी कार्यक्रम पार पडणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी दोघांचा साखरपूडा पार पडणार आहे. १४ डिसेंबरला अंकिता आणि विक्कीचा लग्न सोहळा पार पडेल त्याच दिवशी संध्याकाळी रिसेप्शन होईल ज्याला बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थिती लावणार आहेत.


हे ही वाचा – ‘पाठक बाई’ दिसणार आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत


 

First Published on: December 3, 2021 4:22 PM
Exit mobile version